साऊंड सिस्टीम वापरण्यासंदर्भात माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बेळगाव शहरातील बॅण्ड मालकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलीस अधिकाऱयांनी साऊंड सिस्टीम वापरण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गसुचीसंबंधी माहिती दिली.
खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत बजंत्री समाजातील 45 हून अधिक बॅण्ड मालकांनी भाग घेतला होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱयांनी त्यांना मार्गदर्शन केले.