जलद कृती दलासह संवेदनशील भागात आज होणार पथसंचलन
प्रतिनिधी /बेळगाव
श्री विसर्जन मिरवणूक बंदोबस्तासाठी पोलीस दलाने व्यापक तयारी केली आहे. यासाठी जलद कृती दलाची एक कंपनी दोन दिवसांपूर्वी बेळगावात दाखल झाली आहे. गुरुवार दि. 8 रोजी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून पोलिसांचे पथसंचलन होणार आहे. बंदोबस्तासाठी तब्बल साडेतीन हजारचे पोलीस बळ तैनात असणार आहे.
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर थाटात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. श्रींच्या प्रति÷ापनेपासून आजपर्यंत सर्व काही सुरळीतपणे सुरू आहे. अधिकारी आता श्री विसर्जन मिरवणुकीच्या तयारीला लागले आहेत. दोन दिवस शहरातील संवेदनशील भागात जलद कृती दलाचे पथसंचलन करण्यात आले.
गुरुवारी सायंकाळी पोलिसांचे शक्तिप्रदर्शन होणार आहे. बुधवारी मार्केट व खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील संवेदनशील भागात पोलिसांचे पथसंचलन झाले. पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, एसीपी ए. चंद्राप्पा, पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर आदींसह शहरातील अनेक अधिकाऱयांनी या पथसंचलनात भाग घेतला होता.
श्री विसर्जन मिरवणूक बंदोबस्तासाठी जलद कृती दलाची एक कंपनी, राज्य राखीव दलाच्या दहा तुकडय़ा, सीआर विभागाच्या दहा तुकडय़ा, 400 होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. परजिल्हय़ांतून 2 हजार 300 अधिकारी व पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. एकूण साडेतीन हजार पोलीस बळ तैनात असणार आहे, असे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी सांगितले.
अतिसंवेदनशील भागात 300 अतिरिक्त सीसीटीव्ही
मिरवणुकीवर आठ ड्रोन कॅमेऱयांची नजर असणार आहे. याबरोबरच व्हिडिओ कॅमेऱयातूनही चित्रीकरण करण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात 300 हून अधिक अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडावी, यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.