Tarun Bharat

राज्यातील राजकीय सत्तानाट्य संपलं, बहुमताचा डाव शिंदे-भाजप गटाने जिंकला

मुंबई – राज्यपालांनी आदेश दिल्यानंतर आज शिंदे गटाने आज विधानभवनात बहुमत सिद्ध केले. या विश्वासदर्शक ठरावात शिंदे गटाने शिवसेनेला धक्का देत बहुमताचा ठराव १६० पेक्षा अधिक मतांनी जिंकला. आज सकाळी ११ वाजता विधिमंडळाचं कामकाजला सुरवात झाली. विधानसभा अध्यक्ष पद मिळवून यापूर्वी शिंदे-भाजप सरकारने मोठा विजय मिळवला आहे. मात्र आज शिंदे सरकारची खरी कसोटी पार पडली. आजच्या निकालानंतर २१ जूनपासून राज्यात सुरू असलेलं राजकीय संकट संपलं आहे.

बहुमतासाठी आज सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा समोरासमोर आले होते. महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज आज सकाळी 11 वाजता अधिवेशनाला सुरवात झाली. आज बहुमत सिद्ध करण्यासाठी शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक ठराव भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला. अधिवेशनापूर्वी शिंदे सरकार प्रचंड बहुमताने विश्वास संपादन करेल, असा विश्वास भाजपनं व्यक्त केला होता. आम्ही १६६ पेक्षा जास्त मतांनी बहुमत सिद्ध करू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले होते.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी जारी केला व्हीप

विशेष म्हणजे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांनी सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांच्या बाजूने मतदान करण्यासाठी पक्षाचे आमदार वेगळे करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतंत्र व्हिप जारी केला होता. मात्र शिंदे गटाने देखील उद्धव ठाकरेंचा व्हीप डावलून मतदान केले.

एका रात्रीत संतोष बांगर बदलले
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनी मतदान केले. मात्र एका रात्रीत यांनी संतोष बांगर यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत शिंदे गटात सामील झाले. त्यांनी आज बहुमत ठरवत शिंदे गटाच्या बाजूने मतदान केले. यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी बांगर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

Related Stories

चापगाव-जळगा-करंबळ रस्त्याचे डांबरीकरण पूर्णत्वाकडे

Amit Kulkarni

वांगी येथे शेतकऱ्यांचा महावितरण विरोधात रास्तारोको

Archana Banage

सैनिकांचं गाव….चौकुळ!

Anuja Kudatarkar

‘NSS’च्या स्वयंसेवकांची संख्या वाढविण्यास मंजुरी

datta jadhav

गोकुळची निवडणूक होणारच!

Archana Banage

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लांबणीवर?

Archana Banage