Tarun Bharat

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तास्थानांना सुरूंग लावणार

Advertisements

पुणे / प्रतिनिधी :

आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तास्थानांना सुरुंग लावणार असल्याचा निर्धार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.

भाजपा पुणे जिल्हा कार्यकारिणीची बैठक हंडेवाडी येथे पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वांनी कामाला लागण्याची सूचना त्यांनी या वेळी केली. या वेळी आमादार भीमराव तापकीर, राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळाभाऊ भेगडे आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर विश्वासघाताने सरकार गेले अन् महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. त्यातच कोविडची साथ आली. या काळात महाविकास आघाडी सरकारकडून भाजपा कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. पण परमेश्वर कृपेने आता कोविडची साथही नियंत्रणात आली आणि आपले सरकारही आले आहे. त्यामुळे सर्वांनी कसून कामाला लागावे?. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तास्थानांना सुरूंग लावून त्यांची मक्तेदारी मोडीत काढू. विधानसभा निवडणुकीवेळी मला कोल्हापूरऐवजी पुण्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. विविध तर्कवितर्क लढवले गेले. पण पक्ष नेतृत्वाने मला जे मिशन दिले, त्यानुसार मी कामाला लागलो. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही संघटनेच्या आदेशानुसार बारामती आणि माढा मतदारसंघावर लक्ष्य केंद्रित केले. त्यामुळे पराभवाचा अंदाज आल्यानंतर माढा मतदारसंघातून माननीय शरद पवार यांना माघार घ्यावी लागली. अजूनही हे मिशन संपलेले नाही. आगामी लोकसभापूर्वी ज्या-ज्या निवडणुका येतील, त्या भारतीय जनता पक्षाने ताकदीने लढवायच्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : बारावीच्या पुरवणी परीक्षेत अंशतः बदल

Related Stories

सांगली जिल्ह्यात सहा जणांचा बळी, विक्रमी 354 रूग्ण वाढले

Abhijeet Shinde

‘कोयना’चे दरवाजे पुन्हा चार फूट उचलले

Patil_p

सणसवाडी औद्यागिक क्षेत्रातील एका कंपनीला भीषण आग

Rohan_P

४ मे पासून व्यापार व उद्योग सुरु करण्यास परवानगी मिळावी; व्यापाऱ्यांची मागणी

Abhijeet Shinde

पाचवी माळ : करवीर निवासिनी अंबाबाईची आजची ‘गजारूढ’ पूजा

Abhijeet Shinde

केंद्राच्या पाठिंब्यानेच परमबीर सिंग देशाबाहेर

datta jadhav
error: Content is protected !!