वीज तारांवर पडली होती झाडे : धोकादायक झाडे हटविण्याची ग्रामस्थांची मागणी
प्रतिनिधी /वाळपई
वीज वाहिन्यावर जंगली झाडे पडल्यामुळे सत्तरी तालुक्मयातील सुरला गावामध्ये गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा ठप्प झाला होता. तिसऱया दिवशी वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. तरी वीज वाहिन्यांच्या आजूबाजूची धोकादायक झाडे कापण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सुरला गावाला रिवे गावातून वीजपुरवठा करण्यात येतो. रिवे- सुरला या चार किलोमीटर अंतरामध्ये भूमिगत केबल टाकून ही व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर वीज वाहिन्या ओढून या गावांमध्ये वीजपुरवठा देण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी सदर वीजवाहिनीवर झाड पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे दोन दिवस ग्रामस्थांना काळोखात राहावे लागले. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वाळपई वीज कार्यालयाशी संपर्क साधून वीजपुरवठा पूर्वपदावर आणण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन कर्मचाऱयांनी अथक प्रयत्नांती वीजपुरवठा पूर्वपदावर आणला.
वीज वाहिन्यांवर दोन ठिकाणी झाडे पडली होती. एका ठिकाणी जंगली झाडे हटविण्यात आल्यानंतर वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा तो खंडित झाला. यामुळे तपासणी करण्यात आल्यानंतर दुसऱया ठिकाणी पडलेले झाड हटविण्यात आलेले आहे. यामुळे दोन दिवसानंतर आज वीजपुरवठा पूर्वपदावर आला.
साहाय्यक अभियंता दीपक गावस यांनी सांगितले की, सुरला येथील वीज वाहिन्यांवर दोन ठिकाणी झाडे पडली होती. सदर गावातील वीजवाहिन्या जंगलातून गेलेल्या आहेत. यामुळे वारंवारपणे जंगली झाडे पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असतो.