Tarun Bharat

दत्तजयंतीला रशियन दांपत्याची उपस्थिती ठरली लक्षवेधी

The presence of a Russian couple on Dutt Jayanti became an eye-catcher

रशियन साधक दांपत्याने दत्त जयंतीच्या सुवर्ण पर्वणीला ओटवणे येथील कुडाळकर महाराज समाधी मंदिरात दत्ताचे दर्शन दत्त चरणी लीन झाले. ओटवणे सारख्या ग्रामीण भागात दत्त जयंती उत्सवातील रशियन दांपत्याची ही उपस्थिती यादगार ठरली.


यावेळी समाधी मंदिरात दत्त जयंतीचा उत्सव सुरू असतानाच रशियन दांपत्याच्या अचानक झालेल्या इंट्रिने समाधी मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थित भाविक चक्रावले. या अनाहूत परदेशी दांपत्याच्या लक्षवेधी इंट्रीमुळे उपस्थित सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. सुरुवातीला त्यानी कुडाळकर महाराजांसह दत्तमूर्ती व इतर देवतांचे भारतीय पारंपरिक पद्धतीने दर्शन घेतले. त्यानंतर त्यांना तीर्थ प्रसाद देण्यात आला.
यावेळी परमपूज्य कुडाळकर महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अँड सुरेंद्र मळगावकर आणि अनिकेत कुडाळकर यांनी या रशियन पर्यटन दांपत्याचे स्वागत केले. त्यानंतर सुमारे पाऊण तासाच्या या मुक्कामानंतर या परदेशी दांपत्याने गोव्याच्या दिशेने प्रस्थान केले.

ओटवणे / प्रतिनिधी

Related Stories

वेळणेश्वरच्या समुद्रात नौका बुडाली

Patil_p

प्रशासकीय यंत्रणेमुळे शिक्षक पुरस्कार रद्द!

NIKHIL_N

बिहार : समस्तीपूर जिल्ह्यातील सिव्हिल सर्जनचे कोरोनामुळे निधन

Tousif Mujawar

झिंगझींग झिंगाट मंत्रालयातच चालू असेल, तर मग हे शुद्धीत कसे असणार? ; नितेश राणेंचा सवाल

Archana Banage

धोपेश्वर ‘कोविड सेंटर’चा देखावा ठरतोय आकर्षण

Patil_p

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीला अपघात; महिला जखमी

Anuja Kudatarkar