डिचोली/प्रतिनिधी
भावकई मये येथील श्री रामपुरुष देवस्थानचा 15 वा पुनः प्रति÷ापन वर्धापन दिन सोहळा सोमवार दि. 21 रोजी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. संध्याकाळी 7 वाजता भावकई येथील श्री रामपुरुष देवस्थान सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमास कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या समवेत मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, सरपंच दिलीप शेट, देवस्थान अध्यक्ष अरविंद होबळे गोलतकर, सल्लागार प्रमुख शाणू होबळे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी देवस्थानतर्फे आमदार शेट यांचा मंत्री गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सल्लागार प्रमुख शाणू होबळे व ज्ये÷ सल्लागार गोपी होबळे यांनी दिली.
गोव्यातील होबळे, गोलतकर, नाईक, ढवळे, धवस आदि कुटुंबियांचे श्री रामपुरुष हे कुलदैवत आहे. वर्धापनदिनी सकाळी 8 वा. देवास अभिषेक व नंतर 10 वा. सत्यनारायण महापूजा होईल. यजमानपद श्री. व सौ.संजना सज्जन होबळे करणार आहेत. दुपारी आरती व महाप्रसाद, संध्याकाळी 4 वा. स्थानिक कलाकारांचा भजन गायनाचा कार्यक्रम, सत्कार समारंभानंतर रात्री 8 वाजता वाळपईचे अनिकेत सुरेश नांगरे निर्मित व दिग्दर्शित तथा साईराज नाईक लिखित कोकणी विनोदी नाटक ‘डबल धमाल’ सादर केले जाणार आहे.
बुधवारी दिवजोत्सव
होबळे, गोलतकर, नाईक, ढवळे, व धवस कुटुंबियांचे आद्य दैवत श्री रामपुरुष देवस्थानचा वार्षिक दिवजोत्सव बुध. दि. 23 नोव्हें. रोजी होणार आहे. सकाळी 8 वा. देवास अभिषेक व इतर धार्मिक विधी, रात्री 8 वा. पावणी व रात्री 9 वा. सुवासिनींसाठी दिवजौत्सव सोहळा प्रारंभ होणार आहे. वर्धापनदिन सोहळा आणि दिवजौत्सवास श्री रामपुरुष देवस्थानच्या सर्व कुळांनी, सभासदांनी, सुवासिनींनी आणि भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सल्लागार व देवस्थान समितीने यांनी केले आहे.