Aditya Thackeray criticizes Eknath Shinde शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thakre) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि निवडणूक आयोगावर (EC) जोरदार हल्ला चढवला. निवडणूक आयोगाने तडजोड करून पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाणासंबंधीचा निर्णय दिल्याचा आरोप केला. तसेच आदीत्य ठाकरे यांनी शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती “असंवैधानिक” असल्याचे सांगून आताचे मुख्यमंत्री “भ्रष्टाचारी” असल्याचे विधान केले आहे.
उत्तर मुंबईतील पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “अलीकडे CM या शब्दाचा अर्थ आता Corrupt Man किंवा भ्रष्टाचारी माणूस असा होतो. सध्याचे सरकार हे राज्यघटना बदलणारे असल्यामुळे त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. तसेच हे कंत्राटदारांचे सरकार आहे.” असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलतान त्यांनी महाविकास आघाडी (MVA) सरकार महाराष्ट्राला सुवर्णकाळाकडे घेऊन जात असल्याचा दावा करून, म्हणाले की, “ठाकरे गटाला देण्यात आलेले ज्वलंत मशाल चिन्ह हे पाठीमागून वार झाल्यामुळे होणारा अंधार उजळून टाकण्यासाठी आहे.” उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचीही निंदा केली.