वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिरो सायकल्स लिमिटेडचा इलेक्ट्रिक सायकल ब्रँड हिरो लेक्ट्रो यांनी नवीन ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) नियम लागू झाल्यानंतर दिल्लीमध्ये पाच उत्पादनांच्या किमती या 15,000 रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली सरकारने इलेक्ट्रिक सायकलच्या सबसिडी व करात सवलत दिली असून यामध्ये सी6, सी8आय, एफ6आय आणि सी5 मॉडेलच्या किमतीत 7,500 रुपयांची कपात केली आहे. यासोबतच काही कार्गो वाहनांच्या किमती 15,000 पर्यंत किमती कमी होणार आहेत.
सबसिडीची मदत मिळाली
सबसिडीचे सहाय्य मिळाल्याने ई सायकलपेक्षा अधिक मॉडेल्सना लाभ होत आहे. या सवलतीमुळे समाजात मोठय़ा प्रमाणात हिरो सायकल पोहोचविण्यास मदत होईल.