Tarun Bharat

जी-7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान जर्मनीला जाणार

28 जून रोजी यूएई दौरा करणार

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजी जी-7 शिखर परिषदेसाठी जर्मनीला जाणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. जी-7 शिखर परिषद जर्मनीच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये अर्जेंटिना, इंडोनेशिया, सेनेगल, दक्षिण आफ्रिका या देशांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. जर्मनीचा दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जून रोजी संयुक्त अरब अमिराती दौऱयावर जाणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी सांगितले. 

जर्मनी दौऱयात पंतप्रधान मोदी पर्यावरण, ऊर्जा, हवामान, अन्न सुरक्षा, आरोग्य, लैंगिक समानता आणि लोकशाही या विषयांचा समावेश असलेल्या दोन सत्रांना संबोधित करण्याची शक्मयता आहे. या शिखर परिषदेबरोबरच पंतप्रधान मोदी शिखर परिषदेत सहभागी असलेल्या काही देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही करणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले.

Related Stories

‘कोरोना वॉरियर्स’ना तिन्ही दलांकडून मानवंदना

Rohan_P

पंजाबमध्ये तैनात होणार एस-400

Patil_p

तामिळनाडूत कमल हासन-ओवैसी यांच्यात युती?

datta jadhav

हरियाणामध्ये कोरोना बाधितांची एकूण संख्या 24,002 वर

Rohan_P

‘फॉरएव्हर म्यूट’ पर्याय सादर

Patil_p

पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिद्धू यांना कोरोनाची बाधा

Rohan_P
error: Content is protected !!