Tarun Bharat

जनता दरबारात मुख्यमंत्र्यांनी ऐकल्या नागरिकांच्या समस्या

Advertisements

प्रतिनिधी /सांखळी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोव्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शनिवारी सांखळी रवींद्रभवन परिसरात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा जनता दरबार कार्यक्रम पार पडला. यावेळी भेटण्यास आलेल्या सर्व नागरिकांच्या त्यांनी समस्या जाणून घेतल्या.

सांखळी मतदारसंघातील पाळी, वेळगे, सुर्ल, कुडणे, न्हावेली, आमोणा, हरवळे, आणि सांखळी नगर पालिका क्षेत्रातील अनेक नागरिकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. काहींनी सार्वजनिक विकास कामांची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच पावसाळय़ात ग्रामीण भागात मानवनिर्मित निर्माण होणाऱया समस्या पंचायत पातळीवर सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे काही नागरिकांनी यावेळी मुख्यमंत्री डॉ सावंत याना सांगितले.

आपली कामे लवकर व सुटसुटीत व्हावी या अपेक्षेने गोव्यतील कानाकोपऱयातून लोक मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला येत असतात. त्यातील सर्वांच्याच अपेक्षा पूर्ण होणार असे नसले तरी राज्यातील बहुतेक समस्या सोडवण्यास ते यशस्वी झाले आहेत. मुख्यमंत्री काम करतील या भावनेने आम्ही त्यांच्याकडे येऊन गाऱहाणी मांडतो, अशी प्रतक्रिया उपस्थित नागरिकांकडून यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related Stories

रंगकर्मी दामू नार्वेकर यांचा सत्कार

Amit Kulkarni

गोवा वेल्हा येथील अपघातात 1 ठार

Amit Kulkarni

भाजपला दहापेक्षा अधिक जागा नाही

Amit Kulkarni

चोरटय़ांकडून 25 लाखांचे घबाड जप्त

Omkar B

कुळे पंचायतघर प्रकल्पासाठी रु. 3 कोटी मंजूर

Amit Kulkarni

राजीव कला मंदिरात सुरश्री केसरबाई केरकर संगीत महोत्सवाला थाटात प्रारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!