Tarun Bharat

सोनसडय़ावरील ओला कचरा शेडची संरक्षकभिंत कोसळली

कचऱयाच्या दाबाने प्रकार घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष

प्रतिनिधी / मडगाव

सोनसडा येथील मडगाव पालिकेच्या ओला कचरा साठवून ठेवण्यात आलेल्या शेडची संरक्षक भिंत गुरुवारी एका बाजूने खचून कोसळण्याची घटना घडली. यापूर्वी मार्चच्या महिन्यात अन्य एका बाजूची भिंत कोसळली होती.

नंतर नगराध्यक्ष लिंडन पेरेरा तसेच पालिकेच्या तांत्रिक विभागाच्या अभियंत्यांनी सोनसडय़ावर जाऊन पाहणी केली. कचरा टाकून त्यावर प्रक्रिया करण्याची पद्धत योग्य प्रकारे चालत नसल्याने कचरा सदर शेडमध्ये पडून राहत असतो. त्यामुळे वाढत्या कचऱयाचा दाब घेऊ न शकल्याने ती भिंत कोसळल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे.

यापूर्वी मार्च महिन्यात या शेडच्या अन्य एका बाजूची भिंत कचऱयाच्या दाबाने खचली होती. नंतर तात्पुरती उपाययोजना राबवून दुरुस्ती करण्यात आली होती. आता कोसळलेल्या भिंतीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश आपण तांत्रिक विभागाच्या अभियंत्यांना दिल्याची माहिती नगराध्यक्ष पेरेरा यांनी दिली. या कामाचा अंदाजित खर्च तयार केला जाणार असून त्वरित दुरुस्तीकाम हाती घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

जांबावलीचा गुलालोत्सव साजरा न करण्याचा निर्णय

Amit Kulkarni

कोरोना -सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट

Patil_p

आयआयटी सीमांकन बंद पाडण्यासाठी विरोधक रस्त्यावर

Patil_p

मिग 29 के विमान समुद्रात कोसळले

Amit Kulkarni

शेळपीत गढूळ पाण्याच्या समस्येने नागरिकांच्या आरोग्यावर परिणामाची शक्मयता

Omkar B

माशेलात श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी

Amit Kulkarni