Tarun Bharat

जिह्यात पावसाचा जोर ओसरला

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला असलेला पावसाचा जोर आता ओसरला आह़े रविवारी जिह्याच्या काही ठिकाणी किरकोळ पावसाच्या सरी पडल्या असल्या तरी इतर सर्वत्र कडकडीत ऊन पहावयास मिळाल़े दरम्यान हवामान खात्याने 18 ते 21 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता नसून ‘ग्रीन अलर्ट’ जारी केला आह़े

रत्नागिरी जिह्यात प्रामुख्याने खरिपाच्या हंगामात भात पीक घेतले जात़े सध्या भात पोसवण्यास सुरूवात झाली आह़े कडकडीत ऊनामुळे भातपीकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े मागील महिन्यात पडलेल्या उढनामुळे भातपीकावर करपा पडला होत़ा मात्र त्यानंतर आलेल्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा शेतकऱयांना मिळाला आह़े

मागील काही दिवसात पावसाची आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे मूळ जागेवर सरकताच अरबी समुद्रात बाष्पाचा पट्टा तयार होऊन जोरदार पाऊस पडला होत़ा कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही मुसळधार पावसाने हजेरी लावल़ी मोसमी पावसासाठी पोषक असलेली स्थिती आता हळूहळू क्षीण होत असल्याने पावसाचा जोर घटणार असल्याचे स्पष्ट होत आह़े..

Related Stories

ट्रव्हलर उलटून 11 प्रवासी जखमी

Patil_p

सिंधुदुर्ग ‘ऑक्सिजन आणीबाणी’च्या उंबरठय़ावर?

NIKHIL_N

कोरोनावर मात करीत पुन्हा रुग्णसेवेत

NIKHIL_N

अत्यावश्यक सेवेतील 45 वर्षाखालील कामगारांनाही लस देणे आवश्यक!

NIKHIL_N

रत्नागिरी तालुका ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट

Archana Banage

कडवई रेल्वेस्थानकाची प्रतीक्षा संपली

Patil_p