Tarun Bharat

राकसकोप जलाशय भरण्याच्या मार्गावर

केवळ दोन फुट पाण्याची आवश्यकता : अतिरिक्त पाणी सोडणार मार्कंडेय नदीला

 प्रतिनिधी / बेळगाव

राकसकोप जलाशयाची पाणी पातळी संपुष्टात आल्याने पाणी समस्याची चिंता निर्माण झाली होती. मात्र पंधरादिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. केवळ 2 फुट पाणी भरणे आवश्यक असून शुक्रवार सकाळपर्यंत हा टप्पा देखील पूर्ण भरेल. त्यामुळे  अतिरिक्त पाणी नदी पात्रात सोडण्यात येणार असल्याने शेतकऱयांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

शहराला पिण्याच्या पाणी पुरवठा करणाऱया राकसकोप जलाशयाची पाणी पातळी संपुष्टात आल्याने पाणी समस्या निर्माण झाली होती. केवळ दहा दिवस इतका पाणीसाठा शिल्लक राहिल्याने शहरवासियांना सात दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र पावसाचा जोर वाढल्याने केवळ पंधरादिवसांत राकसकोप जलाशय भरले आहे. अतिरिक्त पाणी नदीला सोडण्यात येणार आहे. त्यामुळे मार्कंडेय नदीला पूर येण्याची शक्मयता आहे. नदीकाठाच्या शेतकऱयांनी तसेच रहिवाशांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. पूरपरिस्थिती निर्माण होण्यापूर्वी शेतवडीत घरे बांधून राहणाऱया शेतकऱयांनी आपल्या जनावरांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याचे आवाहन पाणीपुरवठा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Stories

खानापुरात नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांचा भगवेमय सत्कार

Patil_p

अमन सुणगारचा नवा स्पर्धा विक्रम

Amit Kulkarni

कर्नाटक : दोन कोरोना पॉझिटिव्ह परीक्षार्थींचा केसीईटीत डंका

Archana Banage

शहरात अधिकतर सरकारी शाळांना मैदानेच नाहीत

Omkar B

अतिवाडमध्ये ज्योतिर्लिंग मूर्तीची मिरवणूक उत्साहात

Amit Kulkarni

बेकिनकेरे नागनाथ मंदिराचा तिसरा वर्धापन दिन साजरा

Patil_p