Tarun Bharat

आत्मनिर्भरतेचा ‘दुर्मिळ’ मार्ग

शिरोभाग- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत आत्मनिर्भरतेच्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. आत्मनिर्भरता याचा अर्थ शक्य तितक्या क्षेत्रात स्वयंपूर्णता आणि आयातीवर कमीतकमी अवलंबित्व असा आहे. आज जे देश आर्थिकदृष्टय़ा बलाढय़ आहेत, त्यांना ही प्रगती आत्मनिर्भरतेच्या मंत्रानेच साध्य करता आली आहे, असे त्यांच्या इतिहासावर दृष्टिक्षेप केल्यास दिसून येते. आत्मनिर्भर होण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे देशात मोठय़ा प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास होणे हा आहे. सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की हा राजकीय विषय नसून आर्थिक आहे. देशाच्या आर्थिक सबलीकरणासाठी आत्मनिर्भरता आवश्यक आहे. त्यामुळे अमूक एका राजकीय पक्षाने यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत, आणि तो पक्ष किंवा त्या पक्षाचा नेता आम्हाला आवडत नाही, म्हणून आम्ही आत्मनिर्भरता मानणार नाही, असे म्हणणे हे स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. कारण कोणताही नेता अथवा पक्ष सत्तेवर असला तरी त्याला देशाची प्रगती करायची असेल तर याच मार्गाने जावे लागणार हे निश्चित. इलेक्ट्रॉनिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे अत्याधुनिक तंत्रज्ञान असून त्याच्याशिवाय विकासाचे पान हालत नाही अशी स्थिती आहे. ही उपकरणे निर्माण करण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक ‘दुर्मिळ धातू’ किवा रेअर अर्थ मेटल्स हा आहे. भारतात यांचे साठे असून नुकताच लिथियम या दुर्मिळ धातूचा मोठा साठा सापडल्याचे वृत्त आहे. त्यानिमित्ताने हे धातू आणि आत्मनिर्भरतेच्या मार्गातील त्यांचे महत्व यांच्यावर प्रकाश टाकण्याचा हा अल्पसा प्रयत्न…

दुर्मिळ धातू (रेअर अर्थ मेटल्स) म्हणजे काय?

ड आपल्याला लोह, तांबे, कथिल, शिसे, ऍल्युमिनियम, चांदी आदी नित्य उपयोगातील धातू माहित असतात. दुर्मिळ धातू हा धातूंचा एक वेगळा गट आहे. हे धातू पृथ्वीच्या पोटात मोठय़ा प्रमाणात सापडत नाहीत. त्यामुळे त्यांना दुर्मिळ म्हटले जाते. मात्र, या कमी प्रमाणात सापडणाऱया धातूंमध्ये काही गुणधर्म असे आहेत, की त्यांच्यामुळे ते आधुनिक तंत्रज्ञान विकासात कळीचे ठरले आहेत. मायक्रोप्रोसेसर्स, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीज आदींच्या निर्मितीसाठी ते आहेत.

ड पृथ्वीच्या गाभ्यात सापडणाऱया अनेक धातूंपैकी 17 धातू हे प्रामुख्याने दुर्मिळ या श्रेणीतील मानले जातात. सेरियम (अच्), डिस्प्रोसियम (नल), इर्बियम (टय), युरोपियम (फव), गॅडोलिनियम (गन), होलमियम (ा), लँथेनम (शम), ल्युटेटियम (शव), निओडिमियम (डन), प्रासिओडिमियम (यि), प्रोमेथियम (णि्), सॅमॅरियम (तण्), स्कँडियम (तअ), टर्बियम (रट), थुलियम (रण्), येटरबियम (लट) आणि येट्रीयम (ल) हे ते धातू आहेत. यांपैकी काही अत्यल्प प्रमाणात आहेत.

ड या धातूंमध्ये सोने किंवा लिथियम, कॅडमियम, टिटॅनियम आदी धातूंचा  समावेश केला जात नाही. तथापि, हे धातूही या दुर्मिळ धातुंप्रमाणेच आर्थिक विकासासाठी मौल्यवान आहेत. विशेषतः लिथियम या धातूपासून विजेवर चालणाऱया वाहनांच्या रिचार्जेबल बॅटऱया बनविल्या जातात. त्यामुळे लिथियमचा साठा एखाद्या देशात सापडणे याचा अर्थ त्याच्यासाठी भविष्याच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त होणे असा घेतला जातो. वरील सर्वच धातू अशा प्रकारे मोठय़ा उपयोगाचे आहेत.

गुणधर्म आणि उपयोग काय?

ड या दुर्मिळ धातूंमध्ये मोठी चुंबकीय शक्ती असते, जी लोखंड किंवा तत्सम मोठय़ा प्रमाणात सापडणाऱया धातूंच्या चुंबकीय शक्तीपेक्षा अनेक पटींनी अधिक असते. त्यामुळे ज्या यंत्रांमध्ये अगर साधनांमध्ये चुंबकीय शक्ती आवश्यक असते तेथे ते उपयोगात आणले जातात. त्यांची चुंबकीय शक्ती जास्त असल्याने ते अतिशय कमी प्रमाणात पुरतात. त्यामुळे अतिशय छोटय़ा पण शक्तीवान मोटर्स, वाहनांचे सुटे भाग, संगणकांचे भाग, कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांसाठी लागणारी उपकरणे, विद्युत उपकरणे, जनरेटर्स, इलेक्ट्रॉनिक साधने यात त्यांचा उपयोग होतो.

ड चुंबकीय शक्तीप्रमाणेच यांच्यात इलेक्ट्रोकेमिकल गुणधर्म मोठय़ा प्रमाणावर असतात. तसेच तेजःपुंजता (ल्युमिनिसंट) गुणधर्म असतो. त्यामुळे डिस्प्ले साधने, दूरसंचार साधने, जटील नेटवर्कस्, आरोग्य उपकरणे, देशाच्या संरक्षणासाठीची साधने, क्षेपणास्त्रे, युद्ध विमाने, पर्यावरणस्नेही ऊर्जा निर्मिती (क्लिन एनर्जी), संगणक, स्मार्टफोन्स आदी उपकरणांमध्ये त्यांचा महत्वाचा उपयोग असतो. कित्येक अत्याधुनिक उपकरणे तर त्यांच्याशिवाय निर्माण करताच येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या साठय़ांवर सारे जग अलिकडच्या काळात अवलंबून रहात आहे.

ड याशिवाय उच्च तापमानातील सुपरकंडक्टिव्हिटी, भविष्यकाळातील इंधन मानला गेलेल्या हायड्रोजनचा साठा करणे आणि त्याची वाहतूक, भविष्यकालीन हायड्रोकार्बनविरहित अर्थव्यवस्था, स्वच्छ ऊर्जानिर्मिती आणि तिचे वितरण, लासर तंत्रज्ञान, सूक्ष्मतंत्रज्ञान किंवा नॅनोटेक्नॉलॉजी यांच्या निर्मितीत हे धातू मध्यवर्ती भूमिका घेतात. विषेशतः क्षेपणास्त्रे, रडार यंत्रणा, रडार यंत्रणेला चकवा देणारी युद्धसामग्री, यंत्रमानव निर्मिती, बुलेट ट्रेन्स, अतिवेगवान विमाने अशा असंख्य साधनांची निर्मिती या दुर्मिळ आणि मौल्यवान धातूंशिवाय होतच नाही.

ड या त्यांच्या महत्वाचा परिणाम असा होतो की, समजा एखाद्या देशाने असे तंत्रज्ञान विकसित केले पण त्याच्याकडे या धातूंची वानवा असेल तर तो देश तंत्रज्ञान असूनही त्याच्यापासून साधने निर्माण करु शकणार नाही. त्यामुळे तंत्रवैज्ञानिक बौद्धिक संपदा असूनही तो देश परावलंबी राहू शकतो. जपान, जर्मनी, तैवान अशा अनेक देशांकडे अत्युच्च तंत्रज्ञान आहे. पण या धातूंचा पुरेशा प्रमाणात साठा नाही. त्यामुळे त्यांना अशा धातूंची निर्यात करणाऱया देशांवर अवंबून रहावे लागते. काहीवेळा अशा धातूंचा साठा असणाऱया देशांनी प्रगत तंत्रज्ञान असणाऱया देशांची कोंडी केल्याची उदाहरणेही घडली आहेत.

ड सध्या अवजड यंत्रांचे युग मागे पडून स्मार्ट यंत्रांचे किंवा साधनांचे युग अवतरले आहे. या युगाचा स्वीकार केल्याशिवाय भारतासह कोणत्याही देशाला गत्यंतर नाही. तसे न केल्यास तो देश फार मोठय़ा प्रमाणावर मागे पडू शकतो.  तसेच त्याच्या आर्थिक विकासावरही गंभीर आणि विपरीत परिणाम होऊ शकतो. तो देश अधिक प्रमाणात परावलंबी होतो. याचा लाभ त्याचे प्रतिस्पर्धी देश उठवितात. कित्येकदा अशा परावलंबी देशाच्या स्वातंत्र्यावरही घाला पडू शकतो. म्हणून आज प्रत्येक देश आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या धडपडीत आहे.

सध्या चीनची एकाधिकारशाही

ड सध्या अशा दुर्मिळ आणि मौल्यवान धातूंची उत्खनन, शुद्धता प्रक्रिया आणि निर्यात या तिन्ही महत्वाच्या क्षेत्रांमध्ये चीनची जवळपास एकाधिकारशाही आहे. जगाला आवश्यकतेच्या किमान 55 टक्के पुरवठा एकटय़ा चीनकडून केला जातो. असे म्हटले जाते की, चीनने जर त्यांचा पुरवठा थांबवला तर अमेरिका, जपान, जर्मनी, तैवान, ब्रिटन, फ्रान्स, भारत, रशिया आदी देशांमधील अत्याधुनिक तंत्रवैज्ञानिक उपकरणांचे निर्मिती व्यवसाय कोंडीत सापडू शकतात.

ड काही वर्षांपूर्वी जपान आणि चीनच्या वादात जपानने चीनला निर्वाणीचा इशारा दिला होता. तसेच आपल्या सागरी कार्यक्षेत्रात हस्तक्षेप न करण्याची तंबी दिली होती. काही प्रमाणात सागरी संघर्षही दोन्ही देशांमध्ये झाला होता. तेव्हा जपानला धडा शिकविण्यासाठी चीनने या धातूंचा पुरवठा थांबविला होता. त्यावेळी जपानच्या अक्षरशः नाकीनऊ आले होते. अखेर आंतरराष्ट्रीय दबावामुळे चीनला पुरवठा पुन्हा सुरु करावा लागला होता. अर्थात चीनलाही या निर्यातीतून मोठा पैका मिळत असल्याने तो सहसा हे टोक गाठत काही, ही वस्तुस्थिती आहे.

भारताची स्थिती काय आहे?

ड हे दुर्मिळ धातू आणि त्यांच्यासारखेच इतर मौल्ग्नयवान धातू यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साधनांमध्ये किती महत्व आहे, हे वरील माहितीवरुन समजून येते. या दुर्मिळ धातू आणि मौल्यवान धातूंचे साठे एखाद्या देशाजवळ मोठय़ा प्रमाणात असतील, तर त्या देशाच्या हाती आधुनिक जगाच्या भवितव्याची सूत्रे आहेत, असे स्पष्टपणे मानले जाते. या धातूंचे साठे शोधण्याचा प्रयत्न याचसाठी केला जातो.

ड भारतानेही 2018 पासून मोठय़ा प्रमाणावर अशा धातूंची खनिजे शोधण्याचा प्रयत्न चालविला असून आपला देश यासंबंधात समाधानकारक प्रमाणात भाग्यवान आहे, असे दिसून आले आहे. आपल्याकडे या धातूंचे साठे जगाच्या साठय़ांच्या 6 टक्के इतक्या प्रमाणात आहेत. हे प्रमाण कमी आहे असे प्रथमदर्शनी वाटते. पण अनेक प्रगत देशांकडे एवढय़ा प्रमाणातही त्यांचे साठे नाहीत, असे समजून येते.

ड भारताने गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणात शोध घेऊन दुर्मिळ धातू आणि मौल्यवान धातूंचे साठे शोधण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे नवे साठे दृष्टिपथात येत आहेत. भारताच्या एकंदर साठय़ांचे प्रमाण जगाच्या तुलनेत 6 टक्क्यांपेक्षाही अधिक होऊ शकते, असा आशावाद संशोधकांनी व्यक्त केला आहे. नुकताच सापडलेला लिथियमचा साठा भूगर्भ संशोधकांचा उत्साह वाढविणारा आहे.

ड या दुर्मिळ आणि मौल्यवान धातूंच्या खनिजांचे उत्खनन करणे आणि या धातूंचे शुद्धीकरण करणे हे सोपे काम नाही. त्यासाठी आधी मोठी गुंतवणूक आणि तंत्रज्ञान विकास करावा लागणार आहे. भारताचे सध्या त्या दिशेने प्रयत्न होत असून आशादायक प्रगतीही होत आहे. हीच संशोधन प्रक्रिया पुढे सातत्याने सुरु ठेवणे आणि ती गतीमान करणे या बाबी अत्यावश्यक आहेत, असे तज्ञ मानतात.

ड सर्वसामान्य भारतीयांनाही याची माहिती असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने यासाठी विशेष प्राधिकरण स्थापन करावे अशी मागणी आधुनिक उद्योग क्षेत्राकडून होत आहे. केंद्र सरकारने त्या दिशेने पावले टाकण्यास प्रारंभ केला असून लवकरच एक केंद्र स्थापन होईल अशी शक्यता आहे. सध्यापुरते म्हणायचे झाल्यास आपण या धातूंसंबंधी दुर्दैवी नाही आहोत, ही समाधानाची बाब आहे.

Ajit Date

Related Stories

महिला दिनानिमित्त 51 महिला स्वच्छतादूतांचा सन्मान

tarunbharat

सोशल मीडियावर ट्रेंड होणारे शहाजी पाटील कोण? जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास…

datta jadhav

बँकांची तब्येत अन् बुडीत कर्जांचा विषाणू!

Patil_p

मला स्वर्गात आल्यासारखं वाटतंय…; पाकच्या कैदेतून सुटलेल्या हसीना परतल्या भारतात

datta jadhav

पर्यावरणाचे महत्त्व सांगणारी फोटोथॉन २०२० छायाचित्रण स्पर्धा

tarunbharat

महात्मा गांधींचा फोटो नोटांवर कधी छापण्यात आला?

datta jadhav