Tarun Bharat

आरक्षणाने अनेकांच्या आशेवर पाणी

Advertisements

जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव,

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रभुत्व आहे. आरक्षणामधून महिलांना अध्यक्षपद आलेल्यांमध्ये यापूर्वी हेमलता ननावरे, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, ज्योती जाधव, भाग्यश्री भाग्यवंत, अरुणादेवी पिसाळ यांची नावे समोर येतात. यामधील गायत्रीदेवी पंतप्रतिधी आणि अरुणादेवी या खुल्या प्रवर्गातून महिला म्हणून अध्यक्ष होत्या. तर हेमलता ननावरे या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गातून अध्यक्ष होत्या. त्यांच्या कार्यकाळानंतर पुन्हा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद  हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण पडेल अशी शक्यता गृहीत धरुन अनेकजण तयारी करत होते. मात्र, त्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. 

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सोडत दि. 30 रोजी सायंकाळी उशिरा मंत्रालयातून ग्रामविकास विभागातून जाहीर करण्यात आली. सातारा जिह्यासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हे आरक्षण जाहीर झाले आहे. या आरक्षण पडल्यामुळे ओबीसी हे आरक्षण पडेल असे गृहित धरुन अनेकजण तयारी करत होते. परंतु त्याच्या आशेवर पाणी फिरले आहे.

दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेवर ओबीसी मागासवर्गीय समाजाच्या महिलांकरता अध्यक्षपदाचा बहुमान यापूर्वी बावधन जिल्हा परिषद गटाच्या हेमलता ननावरे यांनी मिळवला होता. त्यांनी 2002 ते 2007 या कालावधीत त्या अध्यक्ष होत्या. त्यावेळी उपाध्यक्ष म्हणून बाळासाहेब भिलारे हे होते. त्यांच्यानंतर महिलांना अध्यक्ष म्हणून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून औंधच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम अशा गावातून एसटी या प्रवर्गातून ज्योती जाधव, एससी या प्रवर्गातून शिक्षिका असलेल्या भाग्यश्री भाग्यवंत यांनी कार्यभार पाहिला होता. त्यानंतर सर्वसाधारण महिला हे आरक्षण लागल्यावर बावधनच्या अरुणादेवी पिसाळ यांच्याकडे पद गेले होते. गतवेळी सर्वसाधारण हे आरक्षण होते. त्यामुळे आता ओबीसी पुरुष असे आरक्षण पडण्याची शक्यता गृहीत धरुन अनेकांची तयारी जोरात सुरु होती. परंतु महिला ओबीसी हे आरक्षण पडल्याने त्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे आता महिलांना पुढे करण्याची शक्यता आहे. जिह्यातून राष्ट्रवादी, भाजपा, काँग्रेससह इतर पक्ष जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी कोणता चेहरा पुढे काढणार हे मात्र निवडणूकीच्या वेळीच चित्र स्पष्ट होणार आहे.

Related Stories

त्याने स्वतःला मारून ट्रक लुटल्याचे सांगितले, पोलिसांनी खाक्या दाखवताच आजऱ्यातील लुटीचा बनाव उघड

datta jadhav

सतेज पाटील यांना रोखण्यासाठी भाजपची फिल्डिंग

Abhijeet Khandekar

३ ऑगस्टला पुण्याजवळ दोन गाड्यांनी मेटेंच्या गाडीचा पाठलाग केला; कार्यकर्त्याचा दावा

Archana Banage

पुण्यात पुन्हा निर्बंध कडक; सोमवारपासून नियम बदलणार

Tousif Mujawar

नागासोबतचा जीवघेणा स्टंट पडला महागात

Archana Banage

कोकण कृषी विद्यापीठातर्फे प्रतीक सरकाळेला सुवर्णपदक

datta jadhav
error: Content is protected !!