रोम / वृत्तसंस्था
इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांनी गुरुवारी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. आपल्या सत्ताधारी आघाडीतील पक्षाने विश्वासदर्शक ठरावात भाग न घेतल्याने त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. पण राष्ट्रपतींनी पंतप्रधान मारियो द्राघी यांचा राजीनामा फेटाळला आहे. इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांनी पंतप्रधान मारियो द्राघी यांचा राजीनामा नाकारला असून राजकीय परिस्थितीचे स्पष्ट चित्र समोर आणण्यासाठी त्यांना संसदेला संबोधित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी आघाडीतील दुसऱया क्रमांकाच्या पक्षाने विश्वासदर्शक ठराव टाळल्याने द्राघी यांनी औपचारिकपणे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता.