Tarun Bharat

शेष भारत संघाची वाटचाल जेतेपदाकडे

वृत्तसंस्था/ राजकोट

सौराष्ट्र आणि शेष भारत यांच्यात सुरू असलेल्या इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात रविवारी खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर शेष भारत संघाने आपली वाटचाल जेतेपदाकडे केली आहे. शेष भारत संघाने सौराष्ट्रवर 227 धावांची आघाडी मिळविली असून सौराष्ट्रने दुसऱया डावात 2 बाद 49 धावा जमविल्या.

या सामन्यात शेष भारत संघाने सौराष्ट्रचा पहिला डाव केवळ 98 धावात गुंडाळल्यानंतर त्यांनी 3 बाद 205 या धावसंख्येवरून आपल्या पहिल्या डावाला पुढे सुरुवात केली. शेष भारत संघाच्या पहिल्या डावात सर्फराज खानने दमदार शतक तसेच कर्णधार हनुमा विहारी आणि सौरभ कुमार यांनी अर्धशतके नोंदवली. सर्फराज खान आणि कर्णधार हनुमा विहारी यांनी चौथ्या गडय़ासाठी 220 धावांची भागीदारी केली. हनुमा विहारीने 184 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारासह 82 धावा झळकविल्या. सर्फराज खानने 178 चेंडूत 2 षटकार आणि 20 चौकारासह 138 धावा जमविल्या. जयंत यादवने 6 चौकारासह 37 तर सौरभ कुमारने 78 चेंडूत 10 चौकारासह 55 धावा जमविल्या. यादव आणि सौरभ कुमार यांनी सातव्या गडय़ासाठी 71 धावांची भर घातली. शेष भारत संघाच्या उर्वरित सात फलंदाजांनी 169 धावांची भर घातली. शेष भारत संघाचा पहिला डाव 110 षटकात 374 धावावर आटोपला. शेष भारतने सौराष्ट्रवर पहिल्या डावात 276 धावांची भक्कम आघाडी मिळविली. सौराष्ट्रतर्फे चेतन साकारियाने 93 धावात 5 तर उनादकट आणि जेनी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

सौराष्ट्रने दुसऱया डावाला सावध सुरुवात केली आणि दिवसअखेर 17 षटकात 2 बाद 49 धावा जमविल्या. सलामीचा हार्विक देसाई 20 धावावर तर स्नेल पटेल 16 धावावर बाद झाले. शेष भारत संघातर्फे सौरभ कुमारने दोन गडी बाद केले. या सामन्यातील खेळाचे तीन दिवस बाकी असून शेष भारत संघ मोठय़ा विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

संक्षिप्त धावफलक ः सौराष्ट्र प. डाव 24.5 षटकात सर्व बाद 98, शेष भारत प. डाव 110 षटकात सर्व बाद 374 (सर्फराज खान 138, हनुमा विहारी 82, सौरभ कुमार 55, जयंत यादव 37, अगरवाल 11, भरत 12, मुकेश कुमार 11, उमरान मलिक नाबाद 16, चेतन साकारिया 5-93, उनादकट 2-100, जेनी 2-58), सौराष्ट्र दु. डाव 17 षटकात 2 बाद 49 (देसाई 20, स्नेल पटेल 16, सौरभ कुमार 2-0).

Related Stories

बेडोसाला पराभवाचा धक्का

Patil_p

प्रो लीग महिला हॉकी : भारत-अमेरिका लढत आज

Patil_p

आयपीएल स्पर्धेतील कामगिरीने ऑस्ट्रेलिया दौऱयाचे दडपण कमी : शमी

Patil_p

अल्कारेझ यूएस ओपनचा नवा चॅम्पियन

Patil_p

मनिका बात्राचे आव्हान समाप्त

Patil_p

स्पिनर कुहनमनचा ऑस्ट्रेलिया संघात समावेश

Patil_p