प्रतिनिधी/ओरोस-
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कसाल या प्रशालेचा दहावीचा निकाल 98.75 टक्के लागला आहे.
आनंदी सदानंद परब हि विद्यार्थीनी 94.20 टक्के गुण मिळवून शाळेतून पहिली आली आहे. सानिका सुधीर निगुडकर हि 93.80 टक्के गुणांसह दवितीय तर सलोनी श्रीकृष्ण मुलीक हि 93.20 टक्के गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेस 80 विद्यार्थी बसले होते. यापैकी 79 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत, सचिव यशवंत परब, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयाbनी त्यांचे अभिनंदन केले आहे.