कळसा भांडुरा प्रकल्प झाल्यास माशांचे अस्तित्व धोक्यात : संवर्धन करण्याची गरज
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्यता म्हादई नदीमुळे निसर्ग सौंदर्यांची मोठी देगणी लाभलेली आहे. मात्र यावर कर्नाटकच्या कळसा भांडुरा प्रकल्पामुळे सौंदर्याला काळा डाग लागणार आहे. सत्तरी तालुक्मयात म्हादई नदीचे भ्रमण आहे. व या नदीच्या प्रवाहातून, परिसरातून फिरताना मनमुराद आनंद लुटता येतो. यामुळे या या परिसरात निसर्गप्रेमी तसेच पर्यटकांची नेहमीच रहदारी या भागात असते.
नगरगाव व सावर्डे पंचायत क्षेत्रातील उस्ते, कडतरी, सोनाळ, नानोडा या गावातून म्हादईचा प्रवाह जातो. या दरम्यान, येथेल राखण देवता पिस्तेश्वर मंदिर वसलेले आहे. राज्यात हे मंदिर प्रसिद्ध आहे. पिस्तेश्वर देवस्थान व येथून प्रवाहित होणाऱ्या नदीपात्रात महाकाय असे देवाचे मासे आहेत. ही म्हादईची श्रीमंती आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने पिस्तेश्वर मंदिराला भेट देतात.
म्हादईच्या तिरावर असंख्य गावे वसलेली आहेत. प्रत्येक गावाला वेगळेपण हे आहेच. म्हादईच्या काठावर पिस्तेश्वराचे पाषाण आहे. लोकांची या देवावर मोठी श्र्रध्दा आहे. सत्तरीच्या सोनाळ,उस्ते गावातून पायी चालत तिथे जावे लागते. त्यासाठी सुमारे 14 किलो मीटरचा प्रवास घडतो. प्रथम उस्ते गावच्या झाडांनी येथे बसवेश्वर मंदिर लागते. व तिथून पुढचा प्रवास सुऊ होतो. वाटेत म्होवाचो गुणो, कणसगाळ, काजरेधाट, कडवळ, साठेली, पेंडाळ अशी वाटेत गावे मिळतात. पायी चालत सुमारे दोन अडीच तास चालावे लागते. लोकांना पिस्तेश्वर देवाची ओढ खुपच असते. काहीजण पिस्तेश्वर मंदिरात एखादी मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्रीफळ ठेवून नवस करतात.
पिस्तेश्वर मंदिर परिसरातील म्हादई नदी पात्रात महाकाय मासे आकर्षण ठरत आहे. येथे येणारे लोक सोबत आणलेले तांदुळ, चुरमुरे या माशांना खाद्य म्हणून देतात. हे पिस्तेश्वर देवाचे मासे आहेत. कर्नाटकाच्या निर्णयामुळे धरण प्रकल्प बांधले गेले तर पिस्तेश्वर येथून वाहणाऱ्या म्हादईच्या प्रवाहावर विपरित परिणाम होऊन भविष्यात येथील देवऊपी माशांच्याही अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती लोकांमध्ये व्यक्त होत आहे.