Tarun Bharat

VIDEO-कोल्हापूर:दूधगंगा उजव्या कालव्याला भगदाड

Advertisements

कोल्हापूर- राधानगरी तालुक्यातील दूधगंगा धरणातून विसर्ग होणाऱ्या https://fb.watch/cROMjOBCVP/ उजव्या कालव्याला मोठे भगदाड पडून कोट्यवधी लिटर पाणी वाया जात आहे.उजव्या कालव्याला भुसखल्लन झाल्याने पडले भगदाड पडल्याची माहिती समोर येत आहे. राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर गावाच्या हद्दीत भगदाड पडले आहे. ऐन उन्हाळ्यात हे भगदाड पडले असून वेळीच याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. ठेकेदाराने निकृष्ट काम केल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. ऐन उन्हाळ्यात कोट्यवधी लिटर पाणी वाया जात असून पिकांना पाणी कमी पडण्याची शक्यता आता ग्रामस्थ व्यक्त करताना दिसत आहे .

काळम्मावाडी धरणाचा दुधगंगा उजव्या कालव्याला १३ते १४किलोमीटर दरम्यान सावर्डे पाटणकर ता.राधानगरी येथील मोरेंचा नाळवा या शेतहद्दीत कालव्याला भले मोठे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे .तसेच पाणी शेतात घुसल्याने शेताना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ऐन उन्हाळ्यात कालव्याला भगदाड पडल्याने दुरुस्तीसाठी बराच कालावधी लागणार असल्याने कालव्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो हेक्टर शेतीला पाण्याचा तुटवडा भासणार आहे. यामुळे कालव्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चर्चा सुरु झाली.
लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी योग्य ती उपाययोजना करून सततच्या कालवा फुटी व गळती थांबवावी अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहेत. कोणत्याही अधिकार्याने सायंकाळपर्यंत अद्यापही घटनास्थळी भेट दिली नव्हती .
काळम्मावाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यात सन १९९९ पासून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात आले होते.पण दुधगंगा उजवा व डावा कालवा आजवर अनेकवेळा फुटलेला आहे. या फुटीमुळे आजअखेर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून कालव्याचे काम अपूर्ण असताना तसेच अस्तरीकरणाचे काम ही निकृष्ठ दर्जाचे झाले म्हणून अनेक वर्षे कालवे ग्रस्त संघर्ष समिती व भुमिपुत्रा वेळोवेळी आंदोलन करून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना निदर्शनास आणून दिले होते.तरी कोणतीही ठोस उपाययोजना आजअखेर झाली नाही. सततच्या कालवा फुटीमुळे येथील स्थानिक शेतकरी त्रस्त झाला असून यावर उपाय म्हणून जिओ सिंथेटिक अस्तरीकरणाचा प्रयोग ही प्रायोगिक तत्वावर करण्यात आला होता. तो ही धुळ खात पडला आहे. कालव्यात अजून काही ठिकाणी झाडे झुडपे व दगड गोटे आहेत.ती प्रवाहात अडथळा ठरत आहेत काही ठिकाणी कालव्यात छोटे मोठी भगदाड आहेत.ती केवळ दगड.व मुरुमाचा साहाय्याने मुजवली आहेत. दरवर्षी लाखो रूपये खर्च कालवा दुरूस्तीवर केला जात आहे. तरीही हे प्रकार का घडत आहेत.अशी विचारणा जनतेतून होत आहे.
कालव्यातुन सध्या८००ते ९०० क्यूसेस दाबाने पाणी सोडण्यात येते आहे.हा दाब आणखीन वाढल्यास कि.मी १ ते १० हा मऊ व तांबड्या मातीचा भूस्तर असल्याने अनेक वेळा कालवा फुटीचे प्रकार घडले आहेत.

कालव्याला भगदाड पडून पाच तास झाले तरी पाणी वाहत होते. त्यामुळे दुधगंगा नदीमध्ये गढूळ पाणी वाहत होते.
हे भगदाड लवकर मुजवून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी करत आहेत. यावेळी सावर्डे गावचे पोलीस पाटील कृष्णात मोरे, योगेश पाटील, महेश मोरे याच बरोबर पाटबंधारे विभागाचे कर्मचारी मधुकर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

महाराष्ट्रात 5,123 रुग्णांना डिस्चार्ज; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.64%

Tousif Mujawar

कार्तिक स्वामी जयंती रविवारी

Archana Banage

‘त्यांना’ महाराष्ट्राचं पाणी पाजण्याची वेळ आलीय

datta jadhav

माजी केंद्रीय कायदेमंत्री अश्विनी कुमार यांचा काँग्रेसला रामराम

datta jadhav

साताऱ्यात रेड अलर्ट, प्रशासन सतर्क; NDRF पथकाकडून कृष्णा-कोयनाकाठी पाहणी सुरु

Abhijeet Khandekar

कोविशिल्ड लसीचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Tousif Mujawar
error: Content is protected !!