Tarun Bharat

मुलायम केसांसाठी कंडिशनर लावण्याची योग्य पद्दत

Advertisements

तरुणभारत ऑनलाइन

केस सुंदर आणि मुलायम होण्यासाठी आपण अनेक प्रॉडक्ट्सचा वापर करतो. केसांसाठी शॅम्पू आणि कंडिशनिंग करणे खूप महत्वाचे असते.शॅम्पू केल्यानंतर केसांना कंडिशनर लावल्यामुळे तुमचे केस मऊ आणि मुलायम होतात. केस स्मूथ आणि सिल्की करण्यासाठी कंडिशनर फायद्याचं ठरतं. मात्र बऱ्याचजणांना कंडिशनरचा वापर नेमका कसा करावा हे माहीत नसतं.चुकीच्या पद्धतीने कंडिशनर लावण्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या केसांवर होऊ शकतो.यासाठी जाणून घ्या कंडिशनर लावण्याची योग्य पद्दत कोणती आहे.

केसांना शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर लावण्यापूर्वी केसांमधील पाणी हळूवार पिळून अथवा हातांच्या मदतीने अलगद काढून टाकणं गरजेचं असतं. शक्य असल्यास धुतलेल्या केसांमधील पाणी टॉवेलने टिपून घ्यावं आणि मगच केसांवर कंडिशनर लावावं.

सुरुवातीला आपल्या हातावर थोडंसं कंडिशनर घ्या, दोन्ही हात एकमेकांवर चोळावेत आणि त्यानंतरच ते आपल्या केसांमध्ये लावावे.

कंडिशनर लावताना केसांना वरपासून खालपर्यंत हळूहळू मसाजही करावा.

कडिनशर नेहमी केसांच्या मध्यापासून टोकांकडे लावावं.केसांच्या मुळांना कंडिशनर कधीच लावू नये. शिवाय तुमच्या कंडिशनरच्या उत्पादनावर ते कितीवेळ केसांवर ठेवावं हे दिलेलं असेल त्यानुसार तितकाच वेळ ते केसांवर असू द्यावं. जास्त वेळ ठेवल्यास तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते.केसांवर कंडिशनर जास्तीत जास्त १ ते २ मिनिट ठेवावा.

शॅम्पू करताना तुमचे केस गुंतण्याची शक्यता असते.अशावेळी गुंतलेल्या केसांवर कंडिशनर लावू नये. कंडिनशरचा वापर करण्यापूर्वी तुमचे मोठ्या दातांच्या कंगव्याने सोडवून घ्यावेत. मगच त्यांच्यावर कंडिशनर लावावं. असं केल्यामुळे केसांवर कंडिशनर व्यवस्थित लागेल आणि त्याचा चांगला फायदा तुम्हाला मिळेल.

कंडिशनर जास्त प्रमाणात वापरले तर आपले केस जास्त मुलायम होतील असं बऱ्याच जणांना वाटत. पण हा एक गैरसमज आहे. कारण कोणतेही उत्पादन अती प्रमाणात वापरल्यास त्यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते. यासाठी योग्य प्रमाणातच कंडिनशर केसांवर लावा. चांगल्या फायद्यासाठी केसांचे दोन भागात विभाजन करा आणि दोन्ही भागांवर अर्धे अर्धे कंडिशनर लावा. ज्यामुळे ते केसांवर व्यवस्थित लागेल.

कंडिशनर लावल्यानंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुवावेत. जोवर केस मोकळे होत नाहीत तोवर केस धुवावेत.

Related Stories

कोविडग्रस्त मातांनी स्तनपान करावे का ?

Amit Kulkarni

पोटातील क्षयरोगाचे आवाहन

Amit Kulkarni

ओळखा कातडीचा कर्करोग

Omkar B

आष्टवक्रासन

Omkar B

पावसाळ्यात घ्या ‘ह्याची’ काळजी

Abhijeet Khandekar

समस्या मसची

Amit Kulkarni
error: Content is protected !!