Tarun Bharat

ऑर्थोपेडिक सर्जनांची भूमिका महत्त्वाची

Advertisements

घटनास्थळी असलेल्यांनी योग्य जबाबदारी घेतल्यास लाखो जीव वाचतील ; आरोग्य-जनजागृती कार्यक्रम

प्रतिनिधी /बेळगाव

‘वाढत्या अपघातांच्या आणि आणीबाणीच्या दिवसांमध्ये अपघात किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतरच्या सोनेरी तासांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. हजारो जीव वाचवताना देशभरातील ऑर्थोपेडिक सर्जन महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. घाबरून न जाता आणि कायद्याची भीती न बाळगता, अपघाताच्या सुरुवातीच्या काळात नागरिकांनी त्वरित काम केले पाहिजे. याला वैद्यकीय क्षेत्रात ‘गोल्डन अवर’ म्हणतात. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी योग्य जबाबदारी घेतल्यास लाखो जीव वाचतील. अशी अपेक्षा कर्नाटक ऑर्थोपेडिक असोसिएशन व कोआकॉनचे अध्यक्ष डॉ. आश्विनकुमार सिंग यांनी केली.

बेळगाव ऑर्थोपेडिक सर्जन सोसायटी व बिम्स् आणि जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय यांच्यातर्फे अस्थी आणि सांधे सप्ताह पाळण्यात येत आहे. यानिमित्ताने संपूर्ण आठवडाभर विविध आरोग्य आणि जनजागृतीचे आयोजन केले आहे. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. सिंग यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.

आणीबाणी परिस्थितीत पाठिंबा मिळणे आवश्यक

बीओएसएसचे अध्यक्ष डॉ. हेमंत कौजलगी म्हणाले, सप्ताहादरम्यान आयोजित केलेल्या कार्यक्रमांविषयी अपघात किंवा जीवन आणीबाणी परिस्थितीत पाठिंबा मिळणे आवश्यक आहे.

पोलीस, नर्सिंग, पॅरामेडिकल कर्मचारी आणि सामान्य लोकांसाठी व्हिडीओ सादरीकरण आणि थेट प्रात्यक्षिकांच्या स्वरूपात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. गोल्डन अवर्सबद्दल जागरुकता आणि दुखापत झाल्यापासून 7 मिनिटांपर्यंत तत्काळ काळजी घेणे आणि गोल्डन अवर्सच्या महत्त्वाविषयी जागरुकता देखील आयोजित केली जात आहे, असेही डॉ. कौजलगी म्हणाले.

सचिव डॉ. पुनित चमकेरी म्हणाले, कसबेकर मेटगुड क्लिनिक आणि केएलई इंटरनॅशनल स्कूलमध्ये केएसआरपी पोलिसांसाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला 300 हून अधिक लोक उपस्थित होते. सरचिटणीस डॉ. भरत राजू, प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. शैलेश उदपुडी, डॉ. अनिल पाटील, डॉ प्रकाश वाली आदी उपस्थित होते.

फेब्रुवारी 2023 मध्ये बेळगावात राज्यस्तरीय परिषद

ते म्हणाले या वर्षाचे घोषवाक्मय ‘मोबाईल लाईफ इज हेल्दी लाईफ’ असे आहे. तर या आठवडय़ाचे घोषवाक्मय प्रत्येकाने एकाचा जीव वाचवावा, असे आहे. बेळगावमध्ये फेब्रुवारी 2023 मध्ये राज्यस्तरीय परिषद होणार असून त्यासाठी तयारी सुरू झाल्याची माहितीही त्यांनी दिली. जेएन मेडिकल कॉलेज आणि बिम्स् यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेत कर्नाटक आणि इतर राज्यांतील 1500 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती डॉ. सिंग यांनी दिली. डॉ. शैलेश उदपुडी यांच्या अध्यक्षतेखालील आयोजक संघाने त्यासाठी तयारी सुरू केली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Related Stories

शेतात गांजा पिकविणाऱयाला दहा वर्षे कारावास

Amit Kulkarni

अमेरिकेतील कोविड-19 संशोधन कार्यात बेळगावचा हातभार

Patil_p

कोरोनाविरोधात संघटित लढा देणे गरजेचे

Patil_p

रस्त्याच्या मध्यभागी सरकारी वाहन पार्क केल्याने वाहतूक कोंडी

Patil_p

कॅसलरॉकजवळ रेल्वे रूळावरून घसरले डबे

Nilkanth Sonar

‘ईडी’च्या नावे भल्याभल्यांसाठी रचले ‘सापळे’

Amit Kulkarni
error: Content is protected !!