Tarun Bharat

अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी झुंबड

अर्ज दाखल करण्यासाठी रांगा : बारावीच्या वर्गांना प्रारंभ

प्रतिनिधी / बेळगाव

अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दहावी उत्तीर्ण होऊन अकरावीला प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांची धडपड सुरू झाली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे विद्यार्थी अर्ज घेणे आणि अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे कॉलेज महाविद्यालयातून अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडताना दिसत आहे.

मागील काही दिवसांपासून प्रवेश प्रक्रिया प्रारंभ झाला आहे. त्यामुळे ही परिस्थित पहायला मिळत आहे. काकतीवेस येथील सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजला देखील प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे कॉलेज परिसरात विद्यार्थी व पालकांची गर्दी दिसून आली आहे.

शैक्षणिक वर्षातील बारावीच्या वर्गांना गुरुवारपासून पुन्हा प्रारंभ झाला आहे. त्यामुळे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली. दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदा शैक्षणिक वर्षात सुरळीत आणि वेळेत प्रारंभ झाला आहे.

मागील दोन वर्षांत कोरोनामुळे ऑनलाईन वर्ग भरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात शिक्षण घेता आले नव्हते. मात्र यंदा शैक्षणिक वर्षाला सुरळीत सुरुवात झाली आहे. पदवीपूर्व शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार बारावीच्या वर्गांना सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी दिसून आली.

Related Stories

लोकसभा पोटनिवडणुकीत कोटीचा खर्च

Amit Kulkarni

..म्हणे सीमाभागात कन्नडसक्ती तीव्र करा!

Amit Kulkarni

मनपा कारभाराच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्याची तयारी

Amit Kulkarni

वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या

Patil_p

पोलीस मुख्यालयात खंडेनवमी पूजन

Amit Kulkarni

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे 15 रोजी उद्घाटन

Amit Kulkarni