`
प्रतिनिधी/ डिचोली
तब्बल दोन वर्षांनंतर जूनमध्ये सुरू होणाऱया शैक्षणिक वर्षांच्या स्वागतासाठी प्रत्येक पालक व विद्यार्थी आतूर झालेला आहे. सध्या डिचोली तालुक्मयातील डिचोली व साखळी बाजारात शालेय सामान खरेदीसाठी पालकांबरोबर विद्यार्थांनीही झुंबड केल्याचे चित्र आहे. 2021-22 या शैक्षणिक वर्षांचे अखेरचे दोन महिने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यची संधी मिळाली होती. परंतु, आता कोविड परिस्थिती काही अंशी नियंत्रणात असल्याने येत्या 6 जून रोजी शाळेचा परंपरेनुसार पहिला दिवस साजरा करण्यासाठी विद्यार्थांबरोबरच पाल व शिक्षकही उत्सुक आहे.
2020 साली फेब्रुवारी महिन्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये,फ यासाठी राज्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती. त्यानंतर लॉकडाउन व नंतर कोरोनाची दुसरी व तिसरी लाट यामुळे राज्यातील शाळांना मुलांच्या सुरक्षिततेसाठी ब्रेक देण्यात आला होता. गेल्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस सुमारे दीड महिना शाळा माध्यमिक विद्यालये सुरू झाली होती. त्यामुळे मुलांनी शाळेत जाण्याचा आनंद घेतला. मात्र त्यानंतर पुन्हा उन्हाळी सुट्टी पडली होती.
सध्याच्या परिस्थितीत राज्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणात असल्याने तसेच कोवीड लस जास्तीत जास्त लोकांनी घेतल्याने या शैक्षणिक वर्षापासून शाळा माध्यमिक विद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. तसेच त्यासाठी सर्व पालक व विद्यार्थीही सज्ज असल्याने सध्या बाजारात शालेय सामान खरेदीसाठी पालकांची झुंबड उडाली आहे.
डिचोली व साखळी येथील स्टेशनरी दुकानांवर वह्या, पेन, पेन्सिल यासह दप्तरे, छत्र्या, रेनकोट खरेदी जोरात चालू आहे. कापड दुकानांवरही गणवेश खरेदी तसेच गणवेश कापड खरेदीसाठी गर्दी होत आहे. गणवेश शिवणाऱया शिंपीही सध्या गणवेश वेळेत शिवून देण्यासाठी मग्न आहेत. राज्यात व देशात सर्व प्रकारच्या वस्तू महाग झाल्या असल्याने शैक्षणिक सामानाच्याही दरांमध्ये बरीच वाढ झाली आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. तरीही मुलांच्या शिक्षणासाठी कळ सोसणारे पालक मुलांच्या आवडीनुसार या सामानांची खरेदी करताना दिसत आहेत.
पालक विद्यार्थ्यांप्रमाणे तालुक्मयातील शाळा माध्यमिक विद्यालयाच्या पहिल्या दिवसासाठी सज्ज होत आहेत. वर्गाची साफसफाई करणे आवश्यक त्या ठिकाणी रंगरंगोटी करणे ही कामे सुरू आहेत. मुलांच्या स्वागतासाठी सर्व शाळा माध्यमिक विद्यालये सज्ज होत आहेत.