Tarun Bharat

समान नागरी कायदा देशभरात लागू होणे आवश्यक

ऍड. यतिश नाईक यांचे मत

प्रतिनिधी /पणजी

गोव्यात गत कित्येक वर्षांपासन अस्तित्वात असलेल्या समान नागरी कायद्याची संपूर्ण देशभरात अंमलबजावणी करण्यात यावी, असे मत ऍड. यतिश नाईक यांनी व्यक्त केले आहे.

नाही म्हणण्यास समान नागरी कायदा देशभरात लागू करण्यासंबंधी आतापर्यंत अनेकदा विविध सार्वजनिक व्यासपीठावरून सखोल चर्चा आणि मतप्रदर्शन झालेले आहे. समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीने तत्कालीन एनडीए सरकारने दि. 22 फेब्रुवारी 2000 रोजी माजी सरन्यायाधीश एम. एन. व्यंकटचलय्या यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करून भारतीय घटनेच्या कार्याचा आढावा घेण्याचे काम हाती घेतले होते. त्यानुसार आयोगाने सादर केलेल्या अहवालात तिसऱया प्रकरणाच्या पॅरा 35 मध्ये याच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी एक यंत्रणा सूचविली होती.

राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये समाविष्ट असलेली मार्गदर्शक तत्वे ही संविधान तयार करणऱया विद्वानांनी मांडलेले उच्च आदर्श आहेत. 19 नोव्हेंबर 1948 रोजी या मार्गदर्शक तत्त्वांवर चर्चा करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ’विधिमंडळ आणि कार्यकारिणी या दोघांनीही भविष्यात या तत्त्वांना नुसती फुंकर घालू नये असा सभेचा हेतू असल्याचे मत व्यक्त केले होते. देशाच्या शासनाच्या बाबतीत यापुढे केल्या जाणाऱया सर्व कार्यकारी आणि कायदेविषयक कारवाईचा ते आधर बनले पाहिजेत, असेही मत त्यांनी मांडले होते.

यापूर्वी व्ही. मार्कंडेय विरुद्ध आंध्रप्रदेश राज्य प्रकरणात (एआयआर 1989 एससी 1308) सर्वोच्च न्यायालयाने, ’मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे हे ’संविधानाचे संयोग’ बनतात, असे मत मांडले होते. मूलभूत हक्क आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे यांच्यात एक संयोग घडवून आणणे हे संविधनाचे उद्दिष्ट आहे. मार्गदर्शक तत्त्वे नि÷sने अंमलात आणल्याशिवाय राज्यघटनेनुसार विचार केलेले कल्याणकारी राज्य साध्य करणे शक्मय नाही.’ घटनेच्या कलम 44 मध्ये नमूद केल्याप्रमाणे, ’देशभरात लोकांसाठी समान नागरी कायदा लागू करण्याचे प्रयत्न करेल.’

अशाप्रकारे वैयक्तिक कायद्यांच्या सर्व बाबींमध्ये गोव्याने 1867 च्या प्रचलित पोर्तुगीज नागरी संहिता चालू ठेवली. जी सर्वधर्मीय नागरिकांना लागू होती. अशा प्रकारे घटनेच्या कलम 44 मध्ये समाविष्ट असलेल्या आदर्शांना मूर्त स्वरूप दिले.  समान नागरी कायदा लागू केल्याने गोवा हे या क्षेत्रात देशातील एक आदर्श राज्य बनले आहे. या यशामुळे त्याचा राष्ट्रीय स्वीकार होण्याचा मार्ग मोकळा झाला पाहिजे, असे मत ऍड. नाईक यांनी व्यक्त केले आहे.

Related Stories

उर्मिला चाकूरकर यांच्या साहित्यावर पणजीत 2 रोजी चर्चासत्र, कविसंमेलन

Amit Kulkarni

सिद्धिविनायकसह सातजणांवर आरोपपत्र दाखल करा

Amit Kulkarni

भाजपाचा आणखीन एक यु-टर्न : आपचा आरोप

Amit Kulkarni

श्रीस्थळ जैवविविधता समितीला नीती आयोग सदस्याचे मार्गदर्शन

Amit Kulkarni

हस्तकलेतून पर्यटनाला चालना देणार

Amit Kulkarni

केरी येथे घरावर आंब्याचे झाड कोसळले

Amit Kulkarni