Tarun Bharat

तेच ज्यू रक्त……

रशियन विदेश मंत्र्यांकडून झेलेंस्की हिटलरशी तुलना : इस्रायल संतप्त

रशियाचे विदेशमंत्री सगेई लावरोव्ह यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांची तुलना जर्मन हुकुमशहा ऍडोल्फ हिटलरसोबत करून एक नवा वाद निर्माण केला आहे. हिटलर आणि झेलेंस्की दोघेही नाझी असून दोघांमध्ये ‘ज्यू रक्त’ असल्याचे म्हटले आहे. लावरोव्ह यांच्या या वक्तव्यावर इस्रायलने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

झेलेंस्की यांचे ज्यू असणे त्यांचा नाझीवाद कमी करत नाही. ऍडोल्फ हिटलरचे रक्तही ज्यूंचे हेते असे लावरोव्ह यांनी म्हटले आहे. लावरोव्ह यांच्या वक्तव्यावर इस्रायले नाराजी दर्शविली आहे. रशियाच्या विदेश मंत्र्यांचे हे विधान ‘अक्षम्य, अपमानास्पद आणि एक ऐतिहासिक चूक देखील आहे’ अशी प्रतिक्रिया इस्रायलचे विदेशमंत्री यापर लॅपिड यांनी दिली आहे.

रशियन राजदूताला केले पाचारण

ज्यूंनी स्वतःची हत्या करविली नव्हती आणि वंशद्वेषाचा सर्वात खालची पातळी म्हणजे ज्यूंवर ज्यूविरोधी असण्याचा आरोप करणे असल्याचे लॅपिड म्हणाले. लावरोव्ह यांच्या विधानानंतर इस्रायलने रशियाच्या राजदूताला पाचारण करत स्पष्टीकरण मागितले आहे. रशियाचे विदेशमंत्री दुसऱया महायुद्धाचा धडा विसरले असावेत असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांनी म्हटले आहे.

Related Stories

आता उत्तराखंड सीमेवरही चिनी सैन्याच्या हालचाली

Patil_p

अरुणाचल भारताचा अविभाज्य भाग ः अमेरिका

Patil_p

जागतिक ‘एनजीओ’ दिवस का साजरा होतो

Amit Kulkarni

युक्रेनमध्ये मारला गेला रशियाचा चॅम्पियन

Patil_p

‘बर्निंग बोट’मध्ये 36 जणांचा मृत्यू

Patil_p

52 वर्षांमध्ये 69 टक्क्यांनी घटली वन्यजीवांची संख्या

Amit Kulkarni