Tarun Bharat

सम्राटक्लबमुळे ग्रामीण भागातील गायक कलाकारांना व्यासपीठ

Advertisements

गीतरामायण गायक कलाकार किशोर भावे यांचे प्रतिपादन : सम्राट इंटरनॅशनलतर्फे  वाळपई येथे संगीत सितारा कार्यक्रम

प्रतिनिधी /वाळपई

संगीत क्षेत्रामध्ये गोव्याने मोठय़ा प्रमाणात क्रांती केलेली आहे. आज गोमंतकातील कलाकाराने जागतिक स्तरावर संगीत क्षेत्रामध्ये आपला नावलौकिक वाढविला आहे. त्यांची परंपरा अखंडितपणे चालू राहणे अत्यंत गरजेचे आहे .सम्राट इंटरनॅशनल या संस्थेतर्फे संगीत सितारा याच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना चांगल्या प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याबद्दल येणाऱया काळात संगीत क्षेत्रामध्ये नवोदितांना एक चांगली संधी निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन गीत रामायण गायक कलाकार किशोर भावे यांनी केले आहे.

सम्राट क्लब इंटरनॅशनल व वाळपई सम्राट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने वाळपई येथील लक्ष्मीबाई मेमोरियल सभागृहात आयोजित संगीत सितारा या गोवा राज्य पातळीवरील पहिल्या उपांत्य फेरी स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर वाळपई सम्राट क्लबचे अध्यक्ष समीर मणेरकर सचिव अंकुश धुरी खजिनदार संजय हळदणकर कार्यक्रमाचे व्यवस्थापक चंदन गावस सम्राट इंटरनॅशनल क्लबचे संगीत सितारा समितीचे अध्यक्ष अविन नाईक राज्यस्तरीय सचिव प्रवीण सबनीस राज्यस्तरीय खजिनदार गौतम खरंगटे व कार्यक्रमाचे संयोजक भाग्यरेखा गावस नंदा माजीक, सुभाषचंद्र गावस यांची खास उपस्थिती होती.

 संगीताचा रियाज हा सातत्याने होणे गरजेचे आहे. यासाठी आपले आरोग्य सध्रुढ राहणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आरोग्य सुदृढ राहिल्यास संगीत क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारची क्रांती निर्माण होऊ शकते. यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वाळपई भागांमध्ये सम्राट क्लबने अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करून या भागातील कलाकारांना प्रोत्साहन मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून केलेले कार्य हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे, असे किशोर भावे यांनी सांगितले.

सम्राट क्लब हा या मातीशी व संस्कृतीशी निगडित असलेली संस्था आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून यासंस्थेने अल्पावधीत या काळामध्ये ही वेगळी अशी प्रतिमा गोमंतकामध्ये निर्माण केलेली आहे. येणाऱया काळातही वेगवेगळय़ा उपक्रमांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून यामध्ये मोठय़ा प्रमाणात नागरिकांनी विद्यार्थ्यांनी व महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन राज्यपातळीवरील अध्यक्ष दीपक नार्वेकर यांनी केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन पारंपरिक समई प्रज्वलित करून करण्यात आले.   समीर मणेरकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन क्लबचे पदाधिकारी भैरो झोरे, सृष्टी नार्वेकर यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे पदाधिकारी भाग्यरेखा गावस यांनी केले. व्यासपीठावरील मान्यवरांची ओळख अनुराधा म्हाळशेकर यांनी करून दिली.

 त्यानंतर गायनाच्या मैफलीमध्ये या फेरीसाठी निवडलेल्या गायक कलाकारांनी आपल्या मैफिली सादर केल्या. यामध्ये अवी परवार (खोतोडा) चिन्मय कर्वे( कारवार) रामेश्वरी राणे (वाळपई) रोहिणी वझे (वाळपई) साक्षी देसाई (उसगाव) श्रुती सालेलकर (होंडा) सोमय्या गुलाटी (मुंबई) स्वतेजा कुंभार (वाळपई) तनया घाडी( आमोणा) व वैष्णवी बधे (मुंबई) यांचा खास करून समावेश आहे. शेवटी चंदन गावस यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Stories

राज्यातील पहिला अद्ययावत वैद्यकीय कचरा प्रकल्प कुंडईत

Omkar B

तर बाणस्तारीचा बाजार प्रकल्प झालाच नसता !

Amit Kulkarni

19 डिसेबंर पर्यंत कुळ मुडंकार खटले निकालात काढून कुळांना न्याय देवू

Amit Kulkarni

काणकोणात विजय संकल्पपूर्ती मेळावा उत्साहात

Amit Kulkarni

मुलीचे अपहरण करणाऱया मौलवीला अटक

Omkar B

मगो पक्षाच्या याचिकेवर आजपासून सुनावणी

Omkar B
error: Content is protected !!