मुंबई
सॅमसंग गॅलक्सी एम 53 5जी स्मार्टफोन सादर होण्याविषयीचा संभ्रम आता दूर झाला आहे. सदरचा नवा स्मार्टफोन 22 एप्रिलला लाँच होणार असल्याचे समजते. सदरच्या फोनची किंमत 25 हजाराच्या आत असणार असून याला 108 मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे. याला गोरीला ग्लासचे संरक्षण असणार असून फोटो रीमास्टरची सुविधा यात असणार आहे. 6 हजार एमएएचची दमदार बॅटरी सह कंपनीचे दोन स्मार्टफोन्स 6 जीबी, 128 जीबी व 8 जीबी, 128 जीबी स्टोरेजसह येणार आहेत.