लाखो मृत व्यक्तींची हाडं कैद
जेव्हा कुठल्याही देशात मानवी मृत्यू अधिक प्रमाणात होऊ लागल्यास सामूहिक अंत्यसंस्कार करावे लागतात. जगात एक असे ठिकाण आहे, जेथे एकत्रितपणे लाखो मृतदेह दफन आहेत आणि त्यांना दफन करून कित्येक वर्षे उलटली आहेत. असेच एक ठिकाण फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये असून तेथे जमिनीखाली लाखो मृतदेहांची हाडं सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.
या ठिकाणाचे नाव प्रेंच कॅटकॉम्ब आहेत. याठिकाणी असंख्य मृतदेहांची हाडं दफन असल्याने याला कब्रांचे तळघर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी 60 लाख मृतांची हाडं आणि कवटय़ा सजवून ठेवण्यात आल्याने लोकांना याबद्दल अत्यंत आश्चर्य वाटते.
तेथे हाडांच्या लांबच्या लांब भिंती तयार झाल्या आहेत. हे ठिकाण जमिनीपासून 20 मीटर खोल असून या तळघराची लांबी सुमारे 200 मीटर इतकी आहे. जागेच्या कमतरतेमुळे 1785 मध्ये अनेक मृतदेहांना एकाच खड्डय़ात दफन करण्यात आले होते. काही काळानंतर या ठिकाणाला अजब तळघरात रुपांतरित करण्यात आले. 2008 साली हे तळघर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत या ठिकाणाला कोटय़वधी लोकांनी भेट दिली आहेत. परंतु अनेक लोक येथे येण्यास घाबरत देखील असतात.