ऑनलाईन टीम/तरुण भरत
Jitendra Awhad, Big News: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ नुसार मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये आव्हाडांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी क्रारदार महिलेनं मुख्यमंत्र्यांची (CM Eknath Shinde) भेट घेतल्यानंतर गुन्हा दाखल केला असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
रविवारी कळवा आणि ठाणे शहाराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे उद्धाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या उद्धाटन कार्यक्रमावेळी आव्हाड यांनी धक्का देत बाजूला केल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. तसेच या महिलेने आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हाही दाखल केला आहे. यांनतर जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी महिलेनं मुख्यमंत्र्यांची (CM Eknath Shinde) भेट घेतल्यानंतर गुन्हा दाखल केला असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत असल्याचं ट्वीट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अशातच पोलिसांनी ७२ तासांत माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही या ट्वीटमधून जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारमधले गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत एक मोठा बॉम्ब फोडला आहे. आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केलं आहे. पोलिसांनी ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केलं आहे. हर हर महादेव सिनेमावरुन विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. तर काल कळवा-मुंब्रा नवीन पुल उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान महिलेनं विनयभंगाचा आरोप केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं ट्वीट केलंय.
हे ही वाचा : ‘मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय’; आव्हाडांच्या ट्विटने खळबळ