Tarun Bharat

‘आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण गोवा’अभियान प्रेरणादायी

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे प्रतिपादन : स्वतः पिकवा भरपूर पैसा मिळवा

प्रतिनिधी /सांखळी

जमिनीची  सुपीकता  ओळखून  लागवड  करतांना कमीतकमी जागेत जास्तीतजास्त उत्पन्न घेत, प्रत्येक गावात भाजी फळे व दूध उत्पादन व इतर उत्पादन घेऊन ‘आत्मनिर्भर  व स्वयंपूर्ण  गोवा’ हे प्रत्येकासाठी  प्रेरणादायी  ठरणार असून त्यासाठी सरकार सर्व ती मदत पुरवणार असल्याचे, प्रतिपादन  मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले.

राज्यातील कृषी संस्कृतीचा वारसा पुढे नेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञाद्वारे शेती करणे गरजेची आहे. प्राकृतिक शेतीवर भर देण्यासाठी 20 जूनपासून विशेष संशोधन सुरू करण्यात येणार आहे.

 मंगळवारी न्हावेली कार्यालय पंचायत सभागृहात कृषी मेळाव्याचे  आयोजन  करण्यात आले होते किसान सेल चे वासुदेव  मेंग गावकर, उदय प्रभुदेसाई जिल्हा सदस्य गोपाळ सुर्लकर, सुभाष मळीक, कालिदास गावस, सुभाष फोंडेकर, नीलिमा  गावस, नम्रता  गवस  व इतर  अनेक पंच सरपंच उपस्थित होते

आज गोव्यात इतर राज्यातून दररोज दूध, भाजी, मासळी व इतर वस्तूंची मोठय़ा प्रमाणात आयात केली जाते. हे सर्व पैसे गोमंतकीय शेतकरी वर्गाला मिळावीत  यासाठी स्वयंपूर्ण गोवा आत्मनिर्भर होण्यासाठी प्रत्येक घटकाने योगदान दिले तर खूप काही साध्य करणे शक्मय आहे. जमिनीची सुपीकता ओळखून लागवड करण्यावर भर देताना प्रत्येकाने शेती पडीक न ठेवता लागवड करावी व स्वयंपूर्णतेचा नारा सत्यात आणावा, असे आवाहन मुख्यमंत्री  डॉ सावंत यांनी  केले

वडिलोपार्जित जमिनीत ज्यांचे हिस्से आहेत. त्यांनी वाद न करतांना समान वाटप करून किसान कार्ड घेऊन सर्वानींच शेती लागवड करावी, असे आवाहन डॉ सावंत  यांनी केले. किसान पेडिट कार्ड मोठे वरदान ठरत  असून आता फुल विपेत्यांनाही उद्योग आधार कार्ड देण्यात येणार असून त्याचा योग्य वापर करावा, असे  आवाहन त्यांनी केले.

यावेळी  दहा प्रगतशील शेतकऱयांचा सत्कार करण्यात आला अनेकांना किसान कार्ड बियाणे, खते तसेच कलमांचे वाटप करण्यात आले

वासुदेव गावकर यांनी पंतप्रधान  मोदिजी यांच्या आठ वर्षातील कार्याचा आढावा घेतला  व शेतकरी वर्गाला मोठा दिलासा या सरकारने दिल्याचे सांगितले. नीलिमा गावस यांनी कृषी योजनांची माहिती  दिली  गोपाळ  सुर्लकर  यांनी स्वागत केले  यावेळी उपस्थित  होते.

Related Stories

पाच वर्षीय मुलीचे नव्या शैक्षणिक धोरणाला आव्हान

Omkar B

सिकेटी फुटबॉल मैदानाचे आज होणार उद्घाटन;5 कोटींचा प्रकल्प

Amit Kulkarni

पालिका निवडणुकाही अचानक जाहीर होण्याची शक्यता

Amit Kulkarni

केरये खांडेपार येथील श्री विष्णू सोमनाथ – एक जागृत देवस्थान

Amit Kulkarni

येत्या काळात गोवा शैक्षणिक हब म्हणून उदयास येईल

Amit Kulkarni

महानंद सतरकर याचा कवळे पंचायतीतर्फे गौरव

Patil_p