वृत्तसंस्था/ माँटे कार्लो
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या माँटे कार्लो मास्टर्स पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ग्रीकचा विद्यमान विजेता सित्सिपस आणि जर्मनीचा ऍलेक्झांडर व्हेरेव्ह यांच्यात उपांत्य फेरीची लढत होणार आहे.
ग्रीकच्या तृतीय मानांकित सित्सिपसने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या दियागो शुवार्त्झमनचा 6-2, 6-7 (3-7), 6-4 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. दुसऱया एका सामन्यात जर्मनीच्या व्हेरेव्हने इटलीच्या सिनेरवर 5-7, 6-3, 7-6 (7-5) अशी मात करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. स्पेनच्या फोकिनाने अमेरिकेच्या टेलर फ्रीट्झचा 2-6, 6-4, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हने यापूर्वी उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे.