Tarun Bharat

अंतिम सत्रातही सेन्सेक्स 303 अंकांनी तेजीत

जागतिक पातळीवर मिळताजुळता कल ः लार्सन ऍण्ड टुब्रो, पॉवरग्रिड कॉर्प,एनटीपीसी लाभात

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय भांडवली बाजारात सलग तिसरे व अंतिम सत्र शुक्रवारी तेजीसह बंद झाल्याचे दिसून आले. यामध्ये जागतिक पातळीवरील मिळता जुळता कल राहिल्याने बीएसई सेन्सेक्स तब्बल 300 अंकांपेक्षा अधिक तेजीत राहिल्याचे दिसून आले.

दिग्गज कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्स 303.38 अंकांनी वधारुन तो 54,481.84 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 87.70 अंकांनी वधारुन निर्देशांक 16,220.60 वर बंद झाला आहे.

सेन्सेक्समधील समभागात लार्सन ऍण्ड टुब्रो, पॉवरग्रिड कॉर्प, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, डॉ.रेड्डीज लॅब, नेस्ले, भारती एअरटेल, इन्फोसिस आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग लाभात राहिले होते.मात्र अन्य कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, इंडसइंड बँक, टीसीएस आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.

जागतिक पातळीवरील स्थितीमध्ये आशियातील अन्य बाजारांपैकी जपानचा निक्की, हाँगकाँगचा हँगसेंग आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी हे लाभात राहिले होते, तर चीनमध्ये शांघाय कम्पोजिट यांचे निर्देशांक काहीशा नुकसानीसह बंद झाले आहेत. युरोपातील प्रमुख बाजारात सुरुवातीलाच घसरणीचा कल राहिला होता. या सर्व घडामोडींचा परिणाम देशातील  बाजारावर झाल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

जागतिक पातळीवरील तेजीसह मुख्य कारणांपैकी काहीशा घटकांमध्ये घसरण राहिली आणि चलनवाढ नियंत्रणात घसरण येण्याच्या संकेतामुळे देशातील बाजाराला सकारात्मक वातावरण मिळाले आहे. यामध्ये केंद्रीय बँकेच्या व्याजदर वाढविण्याची गती कमी होण्याची कारण व अन्य व्यवहारामुळे बाजरातील तेजी कायम राहिल्याची स्थिती दिसून आली आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूड 0.12 टक्क्यांच्या घसरणीसह 104.5 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचला आहे.

Related Stories

मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर?

Patil_p

संन्यासाश्रम

Patil_p

हरवलेले शब्द वगैरे

Patil_p

कोकणच्या गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट

Patil_p

व्हेनेझुएलातील स्थलांतर व कोलंबियाचा मानवतावाद

Patil_p

कोरोनाचा हैदोस जगाच्या वेशीवर

Patil_p