Tarun Bharat

पहिल्या दिवशी सेन्सेक्स किंचित वधारासह बंद

सेन्सेक्समध्ये 180 अंकांची वाढ, एसबीआय, मारुती नफ्यात

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराने काहीशी तेजी राखत बंद होण्यात यश मिळवलं आहे. एसबीआय आणि मारुती सुझुकीचे समभाग सर्वाधिक लाभात राहिले आहेत.

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 180 अंकांच्या तेजीसह 52,973.84 अंकांवर बंद झाला आहे तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही 60 अंक वाढीसह 15842 अंकांवर बंद झाला आहे. भारतीय शेअर बाजारात आज मोठय़ा प्रमाणात चढ-उतार दिसून आला. सेन्सेक्स वरच्या स्तरावरून जवळपास 454 अंकांनी खाली आला आहे. ऑटो, बँक आणि धातू समभागांनी शेअर बाजारात दमदार कामगिरी नेंदवली होती. निफ्टीवर ऑटो निर्देशांक 2.5 टक्के व बँक तसेच वित्त निर्देशांक 1.5 टक्के तेजी राखत बंद झाल्याचे पहायला मिळाले आहे. धातू निर्देशांकही 1 टक्के वाढत बंद झाला. पण दुसरीकडे आयटी, फार्मा आणि एफएमसीजी निर्देशांक मात्र नुकसानीसह बंद झाले आहेत. बांधकाम क्षेत्राशी निगडीत रिऍल्टी निर्देशांक 2.5 टक्के वाढीसह बंद झाला आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 19 समभाग हे तेजीसह बंद झाले आहेत. यामध्ये एनटीपीसी, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, एचडीएफसी, कोटक बँक आणि महिंद्रा आणि महिंद्रा यांचे समभाग तेजीसह बंद झाले.

मागच्या आठवडय़ात भारतीय शेअर बाजाराचा प्रवास हा घसरणीचाच होता. त्यामुळे या आठवडय़ात काय होणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. आठवडय़ाची सुरूवात तेजीसह झाल्याने काहीसा दिलासा मात्र गुंतवणूकदारांना नक्कीच मिळाला आहे. दरम्यान मागच्या आठवडय़ात सेन्सेक्समधील आघाडीवरच्या 10 पैकी 8 कंपन्यांचे बाजार भांडवल 2 कोटी 48 लाख 372 कोटी रुपयांनी घटले होते. देशातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला सर्वाधिक नुकसान झालं. मागच्या आठवडय़ात सेन्सेक्स 2 हजार अंकांनी म्हणजेच 3.72 टक्के इतका कोसळला होता.

विदेशातील बाजारामध्ये काहीशी तेजी दिसून आली. अमेरिकेतील नॅसडॅक निर्देशांक 434 अंकांची तेजी राखून होता. युरोपियन बाजारात चढ-उतार दिसले. आशियाई बाजारात निक्की 119 अंक व हँगसेंग 51 अंकांसह वधारलेला दिसला. कोस्पी आणि शांघाई कम्पोझीट मात्र नुकसानीत व्यवहार करत होते.

Related Stories

‘ब्लूचिप’ने वर्षात दिला 26 टक्के परतावा

Patil_p

आयटीसीला 3 हजार 714 कोटींचा नफा

Amit Kulkarni

कॉन्टॅक्टलेस-पेपरलेस किया मोर्ट्सची सुविधा

Omkar B

कोरोनामुळे अ‍ॅमेझॉनला 7500 कोटींचा तोटा

datta jadhav

एचडीएफसी बँकेकडून व्याजदरात कपात

Patil_p

मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती काही महिन्यांमध्ये अर्ध्यावर ?

Patil_p
error: Content is protected !!