रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग 7 टक्क्यांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नुकसानीमुळे अन्य कंपन्यांचे समभाग प्रभावीत झाल्याने सेन्सेक्स घसरणीसह बंद झाल्याचे दिसून आले. या अगोदरचा दिवसही बाजारात नकारात्मक स्थिती राहिल्याचा प्रभाव शुकवारी पहायवास मिळाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये शुक्रवारी 111.01 अंकांनी घसरुन निर्देशांक 52,907.93 वर बंद झाला आहे. काही वेळ सेन्सेक्स तब्बल 924.69 अंकांनी नुकसानीत राहिला होता. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 28.20 अंकांनी घसरुन 15,752.05 वर बंद झाला. सरकारने शुक्रवारी पेट्रोल व डिझेल आणि विमानइंधन(एटीएफ)वर निर्यात कर लागू करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच स्थानिक पातळीवर उत्पादन करण्यात येणारे कच्च्या तेलावर होणाऱया अप्रत्यक्ष लाभावरही कर लागू होणार असल्याची माहिती आहे. या घडामोडींच्या दरम्यान भारतीय बाजारात प्रभावीत होत बंद झाला आहे. दिग्गज कंपन्यांमध्ये सेन्सेक्स सर्वाधिक 7.25 टक्क्यांनी घसरुन रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये घसरण राहिली, तर पॉवरग्रिड कॉर्प, एनटीपीसी, भारती एअरटेल, मारुती सुझुकी, डॉ.रेड्डीज लॅब आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग प्रामुख्याने नुकसानीत राहिले होते. अन्य कंपन्यांमध्ये आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेन्ट्स, टीसीएस आणि एचडीएफसीचे समभाग तेजीसह बंद झाले. देशातील प्रतिकूल संकेतामुळे रुपयात घसरणीचा कल व तेल शुद्धीकरणामधील विक्रीच्या कारणास्तव बाजाराला नुकसान सहन करावे लागले आहे. इतर आशिया बाजारामध्ये टोकियो, सोल आणि शांघाय हे बाजार घसरणीत होते. एका मासिक सर्वेक्षणामध्ये शुक्रवारी सांगितले आहे, की भारताची निर्माण क्षेत्राचा वेग जूनमध्ये 9 महिन्यांचा निचांकी स्तर पार केला होता. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 1.90 टक्क्यांनी वधारुन 111.1 डॉलर प्रति बॅरेल भाव राहिले आहेत.