रिलायन्स, युनिलिव्हर तेजीत : जागतिक संकेताचा प्रभाव
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारात एक दिवसाच्या घसरणीनंतर पुन्हा गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्स मजबूत होत तेजी परतली आहे. यामध्ये सेन्सेक्स तब्बल 702 अंकांनी वधारत बंद झाला आहे. विविध घडामोडींमध्ये जागतिक बाजारांमध्ये सकारात्मक कल राहिल्याने सेन्सेक्स व निफ्टी मजबूत होत बंद झाले आहेत.
दिग्गज कंपन्यांमध्ये गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि इन्फोसिस यांच्या समभागात लिलाव झाल्याने बाजारात मजबूत स्थिती राहिली होती. चालू आठवडा हा एप्रिल महिन्यात अंतिम असून यामध्ये वायदा पर्याय व महिन्याचे सौदे समाप्त होत आहेत. याचा प्रभाव म्हणून चौफेर विक्री झाल्याने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 701.67 अंकांनी वधारत निर्देशांक 57,521.06 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 206.65 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 17,245.05 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेन्ट्स, एनटीपीसी, पॉवरग्रिड कॉर्प, लार्सन ऍण्ड टुब्रो, भारतीय स्टेट बँक, इन्फोसिस, ऍक्सिस बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग प्रामुख्याने तेजीत राहिले होते. दुसऱया बाजूला मात्र भारती एअरटेल, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, एचसीएल टेक आणि एचडीएफसी यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
जागतिक प्रभाव
जागतिक पातळीवरील विविध घडामोडींपैकी जागतिक बाजारांमध्ये आशियातील अन्य बाजारात जपानचा निक्की, हाँगकाँगचा हँगसेंग, चीनचा शांघाय कम्पोजिट आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी लाभात राहिला होता. युरोपीयन बाजारात दुपारपर्यंत तेजीचा कल राहिला होता. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूड 0.07 टक्क्यांनी घसरुन 105.33 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे. शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थाकडून गुंतवणूकदारांनी बुधवारी 4,064.54 कोटी रुपयाच्या मूल्याची समभाग विक्री केली आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- हिंदुस्तान युनि 2241
- पॉवरग्रिड कॉर्प…. 235
- एनटीपीसी……… 159
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1718
- स्टेट बँक…………. 507
- इन्फोसिस…….. 1583
- ऍक्सिस बँक…….. 779
- सन फार्मा………. 920
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2819
- आयटीसी……….. 261
- आयसीआयसीआय 747
- कोटक महिंद्रा…. 1765
- इंडसइंड बँक……. 987
- मारुती सुझुकी… 7887
- बजाज फिनसर्व्ह 15013
- टाटा स्टील……. 1261
- डॉ.रेड्डीज लॅब…. 4120
- टायटन………… 2512
- अल्ट्राटेक सिमेंट. 6603
- नेस्ले………….. 18350
- टीसीएस………. 3584
- विप्रो…………….. 522
- टेक महिंद्रा……. 1269
- एचडीएफसी …. 2224
- एसबीआय लाईफ 1116
- मॅरिको…………… 542
- डाबर इंडिया…… 571
- आयओसी……….. 129
- गोदरेज………….. 806
- पी ऍण्ड जी….. 14390
- टोरन्टो फार्मा…. 2770
- सीजी कझ्युमर….. 380
- रॅमको सिमेंट……. 792
- एबी कॅपिटल……. 122
- एसीसी………… 2377
- ब्रिटानिया…….. 3371
समभाग घसरलेल्या कंपन्या
- भारती एअरटेल… 747
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 921
- एचसीएल टेक… 1092
- एचडीएफसी बँक 1371
- बजाज ऑटो…… 3833
- पिरामल एन्टर.. 2148
- हिंडाल्को………… 490
- वेदान्ता………….. 411
- पेज इंडस्ट्रीज… 45720
- एचपीसीएल 281