नवी दिल्ली
ब्रिटानिया इंडस्ट्रीजच्या समभागधारकांनी मागील आठवडय़ात झालेल्या सर्वसाधारण बैठकीत जवळपास 5,000 कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावाला नाकारले आहे. समभागधारकांनी संचालक मंडळास गुंतवणूक करणे, कर्ज देणे आणि 5,000 कोटी रुपयांपर्यंत गॅरन्टी देण्यासाठी अधिकृत प्रस्तावाच्या विरुद्ध मतदान केले.
ब्रिटानिया इंडस्ट्रीजने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार गुंतवणूक, कर्ज, विशेष गॅरन्टी व सुरक्षा यासाठीची मर्यादा वाढविण्यासाठी विशेष प्रस्तावाला अपेक्षित बहूमतासोबत मान्यता देण्यात आली नाही.
कंपनी अधिनियमाच्या अंतर्गत आवश्यक असा कोणताही प्रस्ताव मंजूर करण्यासाठी संबंधीत पक्षांमध्ये कमीत कमी 75 टक्के सदस्यांची मते आवश्यक असतात. यावेळी मात्र सदरच्या प्रस्तावाला एकूण 19.60 कोटी मतांमध्ये फक्त 73.35 टक्के मते मिळाली असून यात 26.64 टक्के मते प्रस्तावाच्या विरोधात प्राप्त झली होती.