Tarun Bharat

‘वेदांता’ प्रकरणी ‘शिंदे-फडणवीस’ सरकारचा ‘राष्ट्रवादी’तर्फे निषेध

प्रकल्प गुजरातला वळविल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

प्रतिनिधी/कोल्हापूर

महाराष्ट्रातील तळेगांव (जि.पुणे) येथे येणारा वेदांता-फॉक्सकॉन समुहाचा सुमारे दिड लाख कोटीचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने गुजरातला वळविल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यानंतर शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्रातील तळेगांव (जि.पुणे) येथे येणारा वेदांता-फॉक्सकॉन समुहाचा सुमारे दिड लाख कोटीचा महत्वाकांक्षी प्रकल्प अचानक गुजरातला वळविला. शिंदे-फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच हा प्रकल्प तिकडे गेला. यामुळे महाराष्ट्रातील 1 लाख तरुणांना नोकरीच्या संधीपासून वंचित रहावे लागणार आहे. यामुळे बेरोजगारीत आणखीन भर पडली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने तरुणांना जाती,धर्म, सणासुदी अशा गोष्टींमध्ये जखडून ठेवले आहे. याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फिरोज सरगुर, महादेव पाटील, नागेश फराडे, युवराज साळोखे, युवक शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण, महीला शहराध्यक्षा जहीदा मुजावर, युवती शहराध्यक्षा पुजा साळोंखे, विद्यार्थी अध्यक्ष प्रसाद ऊगवे, कैलास कांबळे, विघ्नेश आरते, शांतीजीत कदम, दिग्विजय काटकर, प्रदिप मंगल, नितीन मस्के, प्रविण भोसले, सौरभ कदम, गणेश जाधव, योगेश पाटील,अमृत सुतार, सुरज साठे, पिंटु धोंगडे, जैद शेख आदी सहभागी झाले होते.

आंदोलनाची दखल घेतली नाही तर ‘चक्का जाम’ आंदोलन
सरकारने या आंदोलनाची योग्य दखल घेऊन पुढील कार्यवाही करुन तरुणांना रोजगार उपलब्ध न करुन दिल्यास, चक्काजाम आंदोलन केले जाईल, असा इशारा महेंद्र चव्हाण यांनी दिला.

Related Stories

वातावरणातील बदलाचा आरोग्यवर परिणाम

Abhijeet Khandekar

कोल्हापूर व मुंबई विभागातील उच्च माध्यमिक शाळांना न्याय देऊ – नाना पटोले

Archana Banage

हातकणंगले: पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल

Archana Banage

गोकुळची निवडणूक लढवणार, अफवांवर विश्वास ठेवू नका: रवींद्र आपटे

Archana Banage

माजी आ.डॉ. सुजित मिणचेकर यांच्या प्रयत्नातून १० लाखांचा निधी मंजूर

Archana Banage

कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत

Archana Banage