Tarun Bharat

वर्षभरात तिसऱयांदा वीज दरवाढीचा शॉक

Advertisements

हेस्कॉमकडून प्रतियुनिट 35 पैशांची वाढ

बेळगाव  / प्रतिनिधी

वाढत्या महागाईत होरपळत असलेल्या नागरिकांना आता पुन्हा एकदा वीज दरवाढीचा शॉक बसला आहे. कर्नाटक विद्युत नियामक बोर्ड (केईआरसी)ने हेस्कॉमच्या कार्यक्षेत्रात प्रतियुनिट 35 पैशांची वाढ केली. एकाच वर्षात तिसऱयांदा दरवाढ करण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

प्रतिवषी 1 एप्रिलपासून राज्यात नवे विद्युत दर लागू करण्यात येतात. यावषी एप्रिल महिन्यात प्रतियुनिट 35 पैसे दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर जून महिन्यात फ्यूअल ऍडजेस्टमेंट चार्जेस (एफएसी) मध्ये वाढ करण्यात आली. केईआरसीने एफएसी दरात वाढ करण्याची परवानगी दिली. हेस्कॉमअंतर्गत येणाऱया जिल्हय़ांमध्ये प्रतियुनिट 27 पैसे दरवाढ करण्यात आली.

19 सप्टेंबर रोजी केईआरसीने पुन्हा दरवाढ करण्याचा निर्णय घेतला. 1 ऑक्टोबरपासून 31 मार्च 2023 या दरम्यान इलेक्ट्रिसिटी चार्जेसमध्ये पुन्हा वाढ करण्यात येणार आहे. हेस्कॉम कार्यक्षेत्रात प्रतियुनिट 35 पैसे वाढ करण्यात येणार असल्याने विजेची दरवाढ डोईजड ठरणार असल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात तिसऱयांदा दरवाढ करण्यात आल्याने नागरिक, व्यापारी व उद्योजकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे विजेचे बिल महिनागणिक वाढत असल्याने वाढीव बिल कसे भरायचे? असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. सर्वसामान्य घराचेही वीजबिल 300 ते 400 रुपये येत असून, नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. घरगुतीसह उद्योग-व्यवसायांनाही या वीजदरवाढीचा दणका बसत आहे.

Related Stories

अलतगा माळीभरम मंदिराचा लोकार्पण सोहळा

Amit Kulkarni

शॉर्टसर्किटने एक एकर ऊस खाक

Patil_p

सुरळीत बससेवा-विद्युत पुरवठा करा

Amit Kulkarni

वाघवडेत महिलांचा स्नेहमेळावा : ग्रा. पं. च्या नूतन सदस्यांचा सत्कार

Omkar B

भाजपमध्ये मतभेद असतील मात्र मनभेद नाहीत!

Omkar B

‘आलमट्टी’चे सर्व दरवाजे उघडले

Amit Kulkarni
error: Content is protected !!