तरुण भारत

सलग सहावे सत्रही पडझडीसह बंद

सेन्सेक्स 137 अंकांनी प्रभावीत : अंतिमक्षणी बाजारात दबावाचे वातावरण

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

चालू आठवडय़ातील सलग सहावे सत्रही शुक्रवारी पडझडीसोबत बंद झाले आहे. चलनवाढीच्या प्रभावामुळे भारतासह जगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा सरु असल्याने देशातील शेअर बाजारातील निर्देशांकांचा घसरणीचा प्रवास कायम असल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरात निर्देशांक वधारला होता, मात्र अंतिमक्षणी विक्रीच्या प्रभावाने दबावात येत सलगचे सहावे सत्र नुकसानीसह बंद झाले आहे.

बीएसई सेन्सेक्सचा निर्देशांक दिवसअखेर 136.69 अंकांनी घसरुन निर्देशांक 52,793.62 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 25.85 अंकांनी प्रभावीत होत 15,782.15 वर बंद झाला आहे.

सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांमध्ये स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, ऍक्सिस बँक आणि मारुती सुझुकी यांचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत. याच्या उलट बाजूला सनफार्मा, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, टायटन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.

जागतिक पातळीवर आशियातील अन्य बाजारांमध्ये टोकीओ, हाँगकाँग, सोल आणि शांघाय यांचे निर्देशांक वाढीसह बंद झाले आहेत. याच दरम्यान युरोपीन शेअर बाजारात दुपारपर्यंत सत्र तेजीत बंद झाले. यावेळी आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड 1.09 टक्क्यांनी वधारुन 108.6 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे. विदेशी संस्थाकडून गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून विक्रीचा माहोल कायम ठेवला आहे. यामध्ये उपलब्ध आकडेवारीनुसार जवळपास 5,255.75 कोटी रुपये किमतीच्या समभागांची विक्री विदेशी गुंतवणूकदारांनी केली आहे.

गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण

भारतासह जगभरातील मुख्य देशांच्या केंद्रीय बँकांनी आपली होणारी चलनवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदारांमध्ये वाढ केली आहे. यासोबतच रशिया युक्रेन युद्धाची पार्श्वभूमी व अन्य आंतरराष्ट्रीय समीकरणांमुळे गुंतवणूकदार विशेषतःहा विदेशातील गुंतवणूकदार आपल्या समभागांची विक्री करत आहेत. यामुळे याचा हा प्रभाव देशातील शेअर बाजारांवर होत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. 

Related Stories

अदानींनी एका दिवसात कमविले 1002 कोटी

Amit Kulkarni

पहिल्या तिमाहीत रोजगार वृद्धी

Amit Kulkarni

पोलादाच्या किमतीत वाढ

Patil_p

विमान कंपन्यांचे समभाग घसरले

Patil_p

एअरटेलची ग्रामीण भागात 5 जी चाचणी

Patil_p

जेह वाडीया यांचा राजीनामा

Patil_p
error: Content is protected !!