Tarun Bharat

शिक्षकांचा ‘चलो बेंगळूर’चा नारा

उद्या बेंगळुरात आंदोलन : जुनी पेन्शन पद्धतीची मागणी

प्रतिनिधी/ बेळगाव

सरकारने 2006 नंतरच्या सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन रद्द केली आहे. यामुळे नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असून जुनीच पेन्शन पद्धती लागू करावी, या मागणीसाठी सोमवार दि. 19 रोजी बेंगळूर येथे शिक्षकांचे राज्यव्यापी बेमुदत आंदोलन होणार आहे. यासाठी बेळगाव शैक्षणिक जिह्यातील शेकडो शिक्षक बेंगळूरला जाणार आहेत.

राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांबाबतचे धोरण बदलले आहे. 2006 नंतर सरकारी नोकरीत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना एनपीएस (नो पेन्शन स्कीम) लागू करण्यात आल्याने त्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन दिली जाणार नाही. या निर्णयाविरोधात सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचाही समावेश करण्यात आला आहे.

नवीन पेन्शन स्कीम रद्द करून जुनीच पेन्शन स्कीम लागू करावी, या मागणीसाठी सोमवार दि. 19 रोजी राज्यभरातील शिक्षकांचे बेंगळूर येथे आंदोलन होणार आहे. एकीकडे सोमवारपासून बेळगाव येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना दुसरीकडे मात्र राज्यभरातील शिक्षक बेंगळूर येथे आंदोलन करणार आहेत. यासाठी बेळगाव जिह्यातून 2006 नंतर रूजू झालेले शिक्षक बेंगळूरला जाणार आहेत. यामुळे शनिवार व रविवारी रेल्वे, खासगी वाहने, ट्रॅव्हल्स व परिवहन मंडळाच्या बसचे बुकिंग शिक्षकांनी केले आहे.

Related Stories

तालुक्यातील तीन चेकपोस्ट कार्यान्वित

Patil_p

सिव्हिल हॉस्पिटलमधील जलशुध्दीकरण केंद्र बंद

Patil_p

क्रिएशन फाईन आर्ट्सच्या प्रदर्शनाला सुरुवात

mithun mane

झोपडपट्टतील नागरिकांना आहारधान्य वितरण

Patil_p

आरएसएसकडून देशप्रेम वाढविण्याचे काम

Patil_p

कोरोना साथीत बिम्सची साथ कुठवर?

Amit Kulkarni