येळ्ळूर शिवार बासमतीचे माहेरघर : भात पोसवणीला प्रारंभ : सर्वच पिके जोमात : पाऊस कमी होण्याची प्रतीक्षा
प्रतिनिधी /येळ्ळूर
बासमती भाताची पोसवणी होताना शिवारामध्ये एक वेगळा सुगंध दरवळतो. आता तो सुगंध पसरू लागला आहे. येळ्ळूर परिसरातील बासमती भाताच्या पोसवणीला सुरुवात झाल्याने आता हा वास परिसरात पसरत आहे. पूर्वीपेक्षा त्याचे प्रमाण कमी असले तरी शेतामध्ये गेल्यावर मात्र हा सुगंध अनुभवायला मिळत आहे. भाताची पोसवणी सुरू झाल्यामुळे पाऊस कमी व्हावा, अशीच अपेक्षा शेतकऱयांतून व्यक्त होत आहे.
बासमतीचे माहेरघर म्हणून येळ्ळूर शिवाराकडे पाहिले जाते. येळ्ळूरबरोबरच वडगाव, शहापूर, अनगोळ, मजगाव, मच्छे, पिरनवाडी, धामणे, सुळगा, देसूर, राजहंसगड, हलगा-बस्तवाड या शिवारातही बऱयापैकी बासमतीचे उत्पादन घेतले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये बासमती पिकावर रोग पडत आहे. त्यामुळे शेतकऱयांनी त्या भात पिकाकडे काहीशी पाठ फिरविली आहे. बासमतीची जागा इंदायणी भात पिकाने घेतली तरी, अनेक शेतकऱयांनी यावषीही मोठय़ा प्रमाणात बासमती पिकाची पेरणी केली आहे.
बासमती पीक जोमात
आता या पिकाची उत्तम वाढ झाली आहे. याचबरोबर पोसवणीलादेखील सुरुवात झाली आहे. सध्या तरी हे पीक जोमात आहे. आता आवश्यकता आहे ती पाऊस कमी होण्याची. याचबरोबर त्यावर कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव होऊ नये अशीच इच्छा शेतकऱयांची आहे.
सध्या तरी बासमती पीक बऱयापैकी आहे. याचबरोबर पोसवणीही उत्तम प्रकारे होत आहे. मात्र, आता होत असलेल्या पावसामुळे या पिकाला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. पाऊस कमी झाला तसेच रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही तर यावषी बासमतीचे पीक बऱयापैकी मिळेल, अशी शक्मयता शेतकऱयांतून व्यक्त होत आहे.
येळ्ळूर शिवारामध्ये जवळपास 40 टक्क्मयांहून अधिक बासमती पीक आहे तर इंद्रायणीही अनेक शेतकऱयांनी पेरले असून त्याचेही उत्पादन बऱयापैकी होणार आहे. याचबरोबर इतर जातीच्या भातांची पेरणीदेखील शेतकऱयांनी केली आहे. जोरदार पाऊस झाल्यामुळे काही भागातील भातपीक कुजून गेले होते. मात्र, शेतकऱयांनी पुन्हा शेतात जोमाने लागवड करून मशागत केली असून, भातपीक घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला बऱयापैकी यश आले आहे. सध्या येळ्ळूर शिवारातील भात पीक जोमात आहे. मात्र यापुढे पावसाने विश्रांती घेऊन साथ दिली पाहिजे, अशी शेतकऱयांची अपेक्षा आहे.