Tarun Bharat

अमृत महोत्सवाला युरोप खंडातील सर्वोच्च शिखरावर गुंजला राष्ट्रगीताचा ध्वनी

सांगलीच्या अभय मोरे यांची कामगिरी

Advertisements

सांगली/प्रतिनिधी

येथील ५८ वर्षीय बॅंक अधिकारी अभय पंडितराव मोरे यांनी १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनी युरोप खंडातील सर्वोच्च रशियास्थित शिखर माउंट एलब्रूस (उंची १८५०५ फूट) रशियन वेळेनुसार सकाळी नऊ वाजता (भारतीय वेळ ११.३०) पादाक्रांत केले. त्या ठिकाणी भारतीय तिरंगा फडकावून राष्ट्रगीत गायले. हे शिखर सर करताना त्यांना उणे २०-२१ तापमानाचा आणि ४५-५० किमी प्रती तास वाहणाऱ्या हिमकणाच्या वाऱ्याचा सलग १२.३० तास सामना करावा लागला.

गराबासी या बेस कॅम्प वरून शिखर चढाई त्यांनी मध्यरात्री १ वाजता सुरवात केली आणि शिखरावर पोहोचण्यास तब्बल आठ तास लागले. परत बेस कँप ला ते दुपारी १.३० वाजता पोहोचले.

केवळ राष्ट्रभक्तीच्या भावनेमुळेच
संपूर्ण चढाई दरम्यान दृश्यमानता फारच कमी असल्याने १५ फुटाच्या अंतरा नंतरचे काहीच दिसत नव्हते. १५ ऑगस्ट रोजी त्यांच्या चार जणांच्या भारतीय चमू शिवाय कोणाचेच समिट होऊ शकले नाही. राष्ट्रभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन ही कामगिरी साधली असे मोरे यांनी तरुण भारत ला सांगितले. रशियन आणि इतर देशातील ४ टीम नी फार खराब वातावरणामुळे मधूनच माघार घेतली.

या मोहिमेसाठी त्यांना ६ ऑगस्ट रोजी माधवराव माने (वय ९९ वर्षे) या ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानींच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर ते १० ऑगस्ट रोजी मॉस्को येथून मिनराली व्होदी आणि नंतर अझाऊ – तेरेस्कोल या ठिकाणी पोहोचले. १२ ऑगस्ट ला ते गाराबशी (उंची १२४६४ फूट) या बेस कॅम्प ला गेले. १२ आणि १३ ला ते स्कालंग्रेडो (उंची १४७६० फूट) आणि पस्तुकोवा रॉक (उंची १५७४४) येथे सरावासाठी चढाई केली.

माउंट एलब्रूस बद्दल

माउंट एलब्रूस हा कॉकेशस पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे आणि ब्लॅक समुद्रापासून १०० किमी आणि कॅस्पियन समुद्र पासून ३७० किमी वर आहे. एप्रिल-मे २०२३ मध्ये माउंट एव्हरेस्ट च्या चढाईच्या तयारीचा भाग म्हणून १४ जून २०२२ रोजी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो आणि १५ ऑगस्ट २०२२ रोजी युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रूस अशी दोन शिखरे सर केली. वयाच्या ५८ व्यां वर्षी अशी कामगिरी करणारे ते महाराष्ट्रातील पाहिले बँक अधिकारी ठरले.

या मोहिमेमध्ये मुंबई अग्निशमन दलातील प्रणित शेळके, योगेश बडगुजर आणि पुणे हडपसर येथील डॉ. मनीषा सोनावणे यांनी भाग घेतला.

अभय मोरे यांना या मोहिमेसाठी महाराष्ट्र पोलीस दलातील एव्हरेस्टवीर सहा.पोलीस निरीक्षक संभाजी नारायण गुरव, (पडवळवाडी, ता.वाळवा, जि सांगली) आणि जेष्ठ गिर्यारोहक विनोद कांबोज, समिट अडवेंचर्स कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संजय घोडावत युनिव्हर्सिटी, रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊन, जयांट्स ग्रुप सांगली व अनेक व्यक्ती, संस्थांचे सहकार्य लाभले.

Related Stories

नवरात्रौत्सवास प्रारंभ, भक्तीभावात घरोघरी घटस्थापना

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन; पालकमंत्र्यांची मोठी घोषणा

Abhijeet Shinde

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची नगरपालिकेत शिव्यांची लाखोली

Abhijeet Shinde

मिरजेत 20 हजारांच्या बदल्यात साडेचार लाखांची मागणी; महिला सावकारांवर गुन्हा

Abhijeet Shinde

सांगली : माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

जिल्ह्यात अतिरिक्त निर्बंध लागू- जिल्हाधिकारी

Sumit Tambekar
error: Content is protected !!