सेन्सेक्स 38 तर निफ्टी 51 अंकांनी नुकसानीत ः टाटा सर्वाधिक नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवल बाजारात चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशीच्या सत्रात प्रारंभीची तेजी टिकवून ठेवण्यात बाजाराला अपयश आले आहे. प्रमुख कंपन्यांची कामगिरी पाहता धातू कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. या नकारात्मक परिणामामुळे अंतिम क्षणी सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत.
प्रमुख कंपन्यांच्या खराब कामगिरीनंतर दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 37.78 अंकांनी प्रभावीत होत 54,288.61 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी निर्देशांक 51.45 अंकांच्या नुकसानीसह 16,214.70 वर बंद झाला आहे.
महात्वाच्या कंपन्यांमध्ये टाटा स्टीलचे समभाग हे सर्वाधिक 12.53 टक्क्यांनी घसरले आहेत. यासह अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, पॉवरग्रिड कॉर्प, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर, लार्सन ऍण्ड टुब्रो, एशियन पेन्ट्स आणि कोटक महिंद्रा यांचे समभाग तेजीमध्ये राहिले होते.
अन्य घडामोडींचा परिणाम
निफ्टीने पुन्हा एकदा सुरुवातीची तेजी गमावली आहे. लोखंड, आयर्न आणि काही पोलाद उत्पादनांवर सरकारने निर्यात शुल्क लागू केल्याच्या कारणास्तव धातूशी संबंधीत असणाऱया कंपन्यांच्या समभागांची विक्री मोठय़ा प्रमाणात झाल्याने झाल्याने सेन्सेक्स व निफ्टाचीही पडझड झाली.
जागतिक पातळीवरील शेअर बाजारांमध्ये चीनचा शांघाय कम्पोजिट, दक्षिण कोरियाचा कॉस्पी आणि जपानचा निक्की हे वाढीसह बंद झाले, तर हाँगकाँगचा हँगसेंग घसरणीत राहिला होता. युरोपीयन बाजारात तेजी होती.
याच दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूड 1.15 टक्क्यांनी वधारुन 113.8 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचला आहे. शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी गुंवणूकदारांनी शुक्रवारच्या सत्रात 1,265.41 कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री झाली होती.