Tarun Bharat

फेडरलच्या निर्णयाने शेअरबाजार आणखी घसरला

Advertisements

सेन्सेक्स 337 अंकांनी घसरला, अमेरिकेतील फेडरल बँकेचा दरवाढीचा परिणाम

वृत्तसंस्था /मुंबई

अमेरिकेतील फेडरल बँकेच्या 75 बेसीस पॉईंट्स दरवाढीच्या निर्णयानंतर भारतीय शेअरबाजार गुरुवारी नकारात्मक कल दर्शवत होता. जागतिक बाजारानेही मान टाकल्याने अर्थातच भारतीय शेअरबाजारही काहीसा हिरमुसल्याचे दिसून आले.

गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 337 अंकांनी घसरत 59,119.72 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 88 अंकांच्या घसरणीसह 17,629.80 अंकांवर बंद झाला. दिवसभरात एकावेळी निफ्टी 150 अंकांनी घसरून 17600 अंकांवर व्यवहार करत होता तर सेन्सेक्सही 450 अंकांनी घरंगळत 58996 अंकांवर आला होता. निफ्टीतील मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांक 0.5 टक्के घसरले होते. एफएमसीजी व मीडिया निर्देशांक मात्र घसरणीच्या बाजारात काहीशी तेजी राखून होते. एफएमसीजी निर्देशांक सलग चार सत्रे तेजीत आहे. या आठवडय़ात तो 4 टक्के वाढला आहे. इकडे माहिती-तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्राची सलगची घसरण मात्र थांबायला तयार नाही. गुरुवारीही आयटीसोबत बँक निर्देशांक 1 टक्का इतका घसरणीत राहिला होता. पंजाब नॅशनल बँकेचा समभाग 2 टक्के वाढला होता. सोबत दक्षिण-मध्य रेल्वेकडून ऑर्डर प्राप्त झाल्याप्रित्यर्थ अशोक बिल्डकॉनचा समभागही चमकताना दिसला तोही 2 टक्के इतका. 258 कोटी रुपयांचे कंत्राट अशोक बिल्डकॉनला मिळाले आहे. दुसरीकडे फेडरल बँकेचा व्याज दरवाढीचा निर्णय व एकंदर महागाईमुळे रुपया पुन्हा घसरणीकडे झुकताना दिसतो आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा 81 वर पोहोचणार असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे तर एलआयसीचा समभाग बाजारात पुन्हा गटांगळय़ा खाताना दिसला आहे. इश्यु किमतीपेक्षा हा समभाग सुमारे 32 टक्के खाली आला आहे. सध्या 949 रुपयांवर कंपनीचा भाव बाजारात व्यवहार करत आहे. दरम्यान, ओपन ऑफरबाबत बंदी उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने फोर्टीस हेल्थकेअरचा समभाग 17 टक्के घसरत 256 रुपयांवर घसरला होता.

अमेरिकेतील फेडरल बँकेच्या निर्णयानंतर आशियाई बाजारात 2 टक्के इतकी घसरण दिसून आली. अमेरिकेतील केंद्रीय बँकेने पुन्हा वाढीचे संकेत देत महागाईशी दोन हात करण्याचा सदरचा निर्णय उपयोगाचा ठरणार असल्याचेही म्हटले आहे. तर रिझर्व्ह बँकही व्याजदराबाबत पुढच्या आठवडय़ात निर्णय घेण्याची शक्मयता आहे. दुपारच्या सत्रात निफ्टी बँक निर्देशांक 1.85 टक्के घसरत 40443 अंकांवर खाली आला होता.

जागतिक बाजारात अमेरिकेतील नॅसडॅक 204 अंकांनी घसरत व्यवहार करत होता. युरोपियन बाजारही नकारात्मक कल दाखवत होते. आशियाई बाजारात पाहता निक्की (159), हँगसेंग (310), कोस्पी (14), शांघाई कम्पोझिट (8), स्ट्रेट टाईम्स 1 टक्का इतका घसरणीत होता. सेट कम्पोझिट (10) व जकार्ता कम्पोझिट मात्र 22 अंकांनी तेजीत होते.

समभाग वधारलेल्या कंपन्या

 • टायटन………… 2737
 • एचयुएल………. 2692
 • एशियन पेंटस्…. 3436
 • आयशर मोटर्स… 3748
 • मारुती सुझुकी… 9401
 • ब्रिटानिया…….. 3825
 • अदानी पोर्टस्…… 946
 • आयटीसी……….. 345
 • टाटा मोटर्स…….. 432
 • ग्रेसीम…………. 1732
 • डॉ. रेड्डीज लॅब्ज. 4182
 • युपीएल…………. 721
 • भारती एअरटेल… 784
 • बजाज फायनान्स 7719
 • सनफार्मा……….. 908
 • महिंद्रा अँड महिंद्रा 1310
 • टीसीएस………. 3007
 • हिंडाल्को………… 412
 • अपोलो हॉस्पिटल 4608
 • एनटीपीसी……… 168
 • हिरो मोटो कॉर्प. 2776

समभाग घसरलेल्या कंपन्या

 • पॉवरग्रीड कॉर्प…. 220
 • ऍक्सिस बँक…….. 789
 • एचडीएफसी बँक 1486
 • कोल इंडिया…….. 227
 • एचडीएफसी….. 2416
 • ओएनजीसी…….. 128
 • बजाज फिनसर्व्ह 1772
 • एसबीआय इन्शु. 1285
 • श्री सिमेंटस्…. 21703
 • कोटक महिंद्रा…. 1892
 • बीपीसीएल…….. 315
 • आयसीआयसीआय 903
 • अल्ट्राटेक सिमेंट. 6239
 • टेक महिंद्रा……. 1048
 • एचडीएफसी लाईफ 545
 • रिलायन्स……… 2486
 • टाटा स्टील……… 103
 • जेएसडब्ल्यू स्टील. 679
 • सिप्ला…………. 1061
 • विप्रो…………….. 397
 • इन्फोसिस           1367

Related Stories

टाटा मोटर्सची व्यावसायिक वाहन उद्योगात होणार वाढ

Amit Kulkarni

मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटी स्मार्ट मीटरसाठी करणार गुंतवणूक

Patil_p

ब्रुकफिल्डकडून 30 एकरची जागा खरेदी

Patil_p

एमएसएमईंना हवे ‘प्रोत्साहन’ – रविंद्र सावंत, लघुउद्योजक

Amit Kulkarni

अनिल अंबानींना न्यायालयाचा दिलासा

Patil_p

ओप्पो इंडियाची कौशल्य विकासासाठी बिटस् पिलानीसोबत भागीदारी

Patil_p
error: Content is protected !!