मुंबई
व्हीनस पाईप्स अँड टय़ूब्ज यांचा समभाग मंगळवारी शेअर बाजारात दमदार तेजी दाखवताना दिसला. समभाग बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 11 टक्के वाढत 586 रुपयांवर पोहचला होता. उत्तम व्यवसाय प्रगतीच्या संकेताचा परिणाम भावावर दिसला आहे. अशा प्रकारे भावामध्ये नवी उंची गाठत समभागाने गुंतवणूकदारांना 2 आठवडय़ात 47 टक्के परतावा दिला आहे. कंपनीला अलीकडेच बीआयएस (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस)चे प्रमाणपत्र मिळाले आहे.