Tarun Bharat

महापालिकेचे बिगुल वाजणार की पुन्हा लांबणीवर

कोल्हापूर
कोल्हापूर महापालिका निवडणूकीचे बिगुल वाजणार की पुन्हा लांबणीवर पडणार याकडे इच्छुकांसह शहरवासियांना उत्स्कुता लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या संकल्प सभेत कोणत्याही क्षणी निवडणूक लागू शकते असे संकेत दिल्यानंतर कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूकीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

कोल्हापूर महापालिका सभागृहाची 15 नोव्हेंबर 2020 रोजी मुदत संपली आहे. कोरोनामुळे ही निवडणूक दोन वेळा थांबली. यामध्येच राज्य शासनाने एक सदस्यीय प्रभाग रचना रद्द करत बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला. त्यामुळे नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवावी लागली. मागील वर्षी निवडणूक होईल, असे चित्र असतानाच कोरोनाची तिसरी लाट आली. यामध्येच ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना आणि निवडणूकीचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडून काढून घेवून राज्य शासनाने स्वतःकडे घेतले. तसेच सध्याची मनपाची प्रभाग रचना रद्द केली. यामुळे कोल्हापूर महापालिका निवडणूकीची प्रक्रिया पुन्हा थांबली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कोणत्याही क्षणी लागू शकतात, असे संकेत दिले. यामुळे कोल्हापूर महापालिका निवडणूकीचा विषय पुन्हा चर्चेत आला.

नगरविकासकडूनही प्रभाग रचना करण्याचे आदेश
प्रभाग रचना करण्याचे अधिकार राज्य शासनाकडे आल्याने नगरविकास विभागाने मागील आठवडय़ात मनपाला पत्र पाठवून प्रभाग रचनेची कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवलेली बहुसदस्यी प्रभाग रचनेचाच अहवाल नगविकास विभागाकडे पाठविण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. दरम्यान, अहवाल नेमका कोणाकडे आणि कधीपर्यंत पाठवावा, याचा अभिप्रभा नगरविकास विभागाकडून महापालिका घेणार आहे.

तर ८० प्रभाग खुले
ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. यामध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेण्याचा निर्णय जर झाल्यास महापालिकेमध्ये 92 पैकी 80 प्रभाग खुले होणार आहेत. यामधूनच ओबीसींना निवडणूक लढवावी लागेल. केवळ 12 प्रभाग अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित राहणार आहेत.

१५ जुनपूर्वी की दिवाळीत निवडणूक
पावसाचा विचार करता मनपाची निवडणूक 15 जुनच्या आतच घ्यावी लागणार आहे. अद्यपही आरक्षण, मतदार यादी अंतिम झालेली नाही. त्यामुळे 15 जुन पर्यंत हे कसे शक्य होणार हाही प्रश्न आहे. दिवाळीनंतरच मनपाची निवडणूक होईल, असेही काही जाणकारांचे मत आहे.

Related Stories

सातारा जिल्हयाला आणखी एक मोठा झटका; ५२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Archana Banage

अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांच्या पुर्ननियुक्तीला केंद्राचा हिरवा कंदील

Archana Banage

कोरोना विरुद्ध लढणाऱ्या प्रशासनाचा गडमुडशिंगीत सत्कार

Archana Banage

वेळेपूर्वी दुकाने उघडी ठेवणाऱया चौघांवर गुन्हा

Patil_p

अंबाबाई दक्षिणा पेटीत 67 लाख 65 हजार रुपये प्राप्त

Abhijeet Khandekar

“मोदी सुद्धा थांबून मला म्हणतात, कैसे हो भाई, याला म्हणतात सत्ता, पॉवर”

Archana Banage