Tarun Bharat

दिल्लीतील फटाके बंदी विरोधातील याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली : दिल्लीत फटाक्यांची निर्मिती, साठवण आणि विक्रीवर १४ सप्टेंबरपासून बंदी घालली आहे. या बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली असून “लोकांना स्वच्छ हवा घेऊ द्या…तुमचे पैसे मिठाईवर खर्च करा” असा सल्ला देऊन सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती (DPCC) च्या सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या विक्रीवर आणि वापरावरील पूर्ण बंदीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर फटाक्यांशी संबंधित समस्यांचे प्रलंबित असल्याचे कारण देऊन विचार करण्यास नकार दिला. या यचिकेच याचिकाकर्त्यांनी म्हटले होते की दिल्ली प्रदुषण नियंत्रण समितीने १४ सप्टेंबरला घातलेली मनमानी आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्याच्या उपजीविकेवर विपरित परिणाम होत आहे.

मागिल काही दिवसापुर्वी दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्लीत फटाक्यांची निर्मिती, साठवण आणि विक्री हा दंडनीय गुन्हा असून त्याचे उल्लंघन केल्यास ५००० रुपयांपर्यंत दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास होईल असे जाहिर केले.

Related Stories

एलॉन मस्क यांच्या संपत्तीत घट

Patil_p

नव्या कृषी कायद्यांच्या क्रियान्वयनास तात्पुरती स्थगिती

Patil_p

दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय

Archana Banage

गुजरातने केलं, महाराष्ट्र केव्हा करणार ‘म्यूकोरमाइकोसिस’च्या वायल खरेदी?

datta jadhav

‘230’ स्पीडने बीएमडब्ल्यूची कंटेनरला धडक, चौघे ठार

Patil_p

लोकसभेचे 17 खासदार कोरोना पॉझिटिव्ह

datta jadhav