Tarun Bharat

जगातील सर्वात उंच बॉडीबिल्ड

Advertisements

चार जणांना पुरेल इतका आहार

सद्यकाळातील तरुण-तरुणी स्वतःच्या शरीराबद्दल अधिकच जागरुक राहत आहेत. याकरता ते जिममध्ये जाण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. जर तुम्ही जिममध्ये गेला असाल तर तेथे तुम्हाला अरनॉल्ड किंवा फील हीथ यासारख्या अनेक बॉडीबिल्डर्सची छायाचित्रे दिसून येतील. सर्व बॉडीबिल्डर्सचा स्वतःचा असा वेगळा आहार असतो. जगातील सर्वात उंच बॉडीबिल्डरचा आहार मात्र 4 सर्वसामान्य माणसांचे पोट भरू शकेल इतका आहे.

7 फूट 2 इंच उंची

जगातील सर्वात उंच बॉडीबिल्डर ओलिव्हर रिक्टर्सचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. ओलिव्हरची उंची 7 फूट 2 इंच असून वजन सुमारे 150 किलो आहे. सोशल मीडियावर ओलिव्हरचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

चित्रपटांमध्ये केले आहे काम

ओलिव्हर स्वतःच्या उत्तम बॉडीसाठी ओळखला जातो. याचबरोबर तो स्वतःच्या अभिनयासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. ओलिव्हरने द किंग्स मॅन, ब्लॅक विडो आणि इंडियाना जोन्स 5 यासारख्या अनेक गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

चकित करणारा आहार

डच बॉडीबिल्डर ओलिव्हर स्वतःच्या आहारात 6 हजार ते 7 हजार कॅलरी प्राप्त करतो, याच्या या आहारात 300 ग्रॅम प्रोटीन असते, ज्यासाठी तो मासे, व्हे प्रोटीन आणि ओट्स खातो. स्वतःच्या शेकद्वारे तो 700 कॅलरी प्राप्त करतो आणि दिवसभरात 5-6 वेळा शेक पित असतो. एका सामान्य व्यक्तीच्या आहारात 1500 ते 2000 कॅलरींचा अंतर्भाव असतो.

Related Stories

गुलाबी रंगासोबत विवाहबद्द

Patil_p

रस्त्यावर माकडांदरम्यान गँगवॉर

Patil_p

‘दगडूशेठ गणपतीला’ नववर्षाच्या प्रारंभी भाविकांची दर्शनासाठी रिघ

Rohan_P

टाकलेल्या अन्नामुळे पृथ्वीसाठी संकट

Patil_p

चंद्रो तोमर यांच्या नावाने ओळखले जाणार नोएडामधील ‘शूटिंग सेंटर’

Rohan_P

‘या’ निर्धाराला सलाम

Patil_p
error: Content is protected !!